Rahul Gandhi | राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या FIR च्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन
Pune Congress – (The Karbhari News Service) – केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी १८ डिसेंबर रोजी संसदेत संविधानाच्या विषयावर आपले मत मांडताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद बेताल वक्तव्य केले याच्या निषेधार्थ काल१९ डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाने संसदेच्या बाहेर निदर्शने केली आणि भाजपाच्या खासदारांनी इंडिया ब्लॉगच्या खासदारांना संसदेमध्ये प्रवेश करून दिला नाही आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मा. मल्लिकार्जुन खर्गे यांना धक्काबुक्की केली त्यामुळे खाली पडले. या घटनेची दिशाभुल करण्यासाठी भाजप खासदारांनी राहुल गांधीमुळे त्यांच्या खासदारांना दुखापत झाली असे खोटे आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांवर दबाव आणला. पोलीसांनी दबावाखाली राहुल गांधीवर FIR दाखल केला याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ना. गोपाळकृष्ण गोखले स्मारक, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन केली. (Home Minister Amit Shah)
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाचे नेहमीचे धोरण आहे की, ‘‘खोटे बोला पण रेटून बोला’’. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी अमित शहांनी केलेल्या वक्तव्या विरोधात संसदेत आवाज उचलला आणि देशाच्या जनते समोर भाजपाचा पर्दाफाश केला यामुळे त्यांनी पोलीसांवर दबाव टाकून खोटी FIR दाखल केली. आज काँग्रेस पक्षाने भाजपाच्या दडपशाही विरोधात आम्ही निदर्शने करून निषेध व्यक्त करीत आहोत. भाजपाच्या या कृत्यास जनता योग्यवेळी धडा शिकवेल.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत ॲड. अभय छाजेड, सदानंद शेट्टी, अमिर शेख, मेहबुब नदाफ, अजित दरेकर, नीता रजपूत, लता राजगुरू, राज अंबिके, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, संदिप मोकाटे, गुलाम हुसेन खान, संजय मोरे, ब्लॉक अध्यक्ष अजित जाधव, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, भरत सुराना, सुजित यादव, विनोद रनपिसे, अविनाश अडसुळ, भुषण रानभरे, प्रदिप परदेशी, ॲड. नंदलाल धिवार, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, उषा राजगुरू, अर्चना शहा, शारदा वीर, सुंदरा ओव्हाळ, सीमा सावंत, अमित कांबळे, गणेश गुगळे, किशोर मारणे, रामदास केदारी आदी उपस्थित होते.
COMMENTS