Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

HomeपुणेBreaking News

Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

Ganesh Kumar Mule Jul 08, 2023 11:24 AM

Budget | PMC Pune | महापालिका आयुक्त 24 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!
PMC Budget | प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?
Arvind Shinde | Pune Congress | अरविंद शिंदे यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार

Rahul Gandhi | INC Pune | राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन

 

  Rahul Gandhi | INC Pune |  काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या वक्तव्‍याबाबत गुजरातच्या एका भाजप नेत्याने  गुजरात न्यायालयात बदनामीचा खोटा आरोप करत खटला दाखला केला होता. या प्रकरणात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या निकालाला  राहुल गांधी यांनी गुजरात जिल्हा सत्र न्यायालयात (Gujrat Session Court) आव्‍हान दिले होते.  जिल्हा व सत्र न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निकाल कायम ठेवल्याने या विरूध्द  गुजरात उच्च न्यायालयात आव्‍हान दिले होते. या प्रकरणी  गुजरात उच्च न्यायालयाने (Gujrat High Court) निकाल दिला असून गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. अशा या खोट्या मानहानी खटल्यात राहुलजी गांधी यांना अडकवल्याच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (INC Pune) वतीने आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. (Rahul Gandhi | INC Pune)

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे (INC Pune President Arvind Shinde) म्हणाले की, ‘‘भाजपा विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंड बंद करण्याची गुजराती स्टाईल देशातील जनता गेल्या अनेक वर्षांपासून पहात आहे. मा. राहुलजी गांधी यांनी मोदी आणि अदानीच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून ही जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. मा. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु मा. राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही परंतु राजकीय द्वेषातून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मोदी सरकारने विरोधी पक्ष संपविण्याचे षडयंत्र चालू केले आहे. लोकतंत्राची हत्या व पायमल्ली करण्याचे काम भाजप सरकार सध्या करीत आहे.’’

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रा. विकास देशपांडे यांनी ही निषेधाचे भाषण केले.

यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, अजित दरेकर, वीरेंद्र किराड, गोपाळ तिवारी, बाळासाहेब दाभेकर, हाजी उस्मान तांबोळी, नीता रजपूत, लता राजुगरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, रजनी त्रिभुवन, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, ब्लॉक अध्यक्ष प्रदिप परदेशी, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, सुनिल घाडगे, सचिन आडेकर, अशोक जैन, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, NSUI अध्यक्ष अभिजीत गोरे, महिला अध्यक्षा पुजा आनंद, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, गुलाम खान, विनय ढेरे, अक्षय जैन, आशुतोष शिंदे, वाहिद निलगर, अविनाश अडसूळ, राज घलोत, रेखा घलोत, वैष्णवी किराड, परवेज तांबोळी, राजेंद्र पेशने, सुंदरा ओव्‍हाळ, ज्योती परदेशी, सीमा सावंत, घनश्याम निम्हण, श्रीकृष्ण बराटे, दिपक ओव्हाळ, राहुल तायडे, विनोद चौरे, सचिन भोसले, सईदभाई सय्यद, बाबा सय्यद, मुन्ना खंडेलवाल, लतेंद्र भिंगारे, पपिता ओव्‍हाळ, शारदा वीर, वैशाली रेड्डी, ॲड. राहुल ढाले, ॲड. फैय्याज शेख, ॲड. राजेंद्र काळेबेरे,  आदींसह असंख्य कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार रवि आरडे यांनी मानले.

News Title |Rahul Gandhi | INC Pune | Agitation on behalf of Pune City District Congress Committee in support of Rahul Gandhi