Rahul Gandhi in Pune | मोदींनी पंतप्रधान पदाची आब राखली नाही | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

HomeBreaking Newsपुणे

Rahul Gandhi in Pune | मोदींनी पंतप्रधान पदाची आब राखली नाही | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

गणेश मुळे May 04, 2024 9:42 AM

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल 
Pune Airport Terminal | विमानतळ टर्मिनलचे उदघाटन मोदींसाठी थांबले हा प्रकार संतापजनक | माजी आमदार मोहन जोशी
City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

Rahul Gandhi in Pune | मोदींनी पंतप्रधान पदाची आब राखली नाही | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका

– मोदींनी २२ लोकांना जेवढा पैसा माफ केला ‌तेवढा आम्ही देशातील जनतेला देणार

 

Ranhul Gandhi Pune Tour – (The Karbhari News Service) – पंतप्रधानांनी देशातील नागरी प्रश्नांवरनागरिकांच्या योजनांवर आणि विकास कामांवर बोलणे अपेक्षित आहे. मात्रपंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर न बोलता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर आपमानकारक बोलून पंतप्रधान पदाची आब (गरीमा) घालवत आहेतअशी घाणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुण्यातील सभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 22 लोकांना जेवढे कर्ज माफ केलेतेवढाच पैसा आम्ही आमचे सरकार आल्यावर देशातील नागरिकांना देऊअसेही ते म्हणाले.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रे‌स महाविकास आघाडी व इंडिया प्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आरटीओ जवळील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरकाँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथलाप्रदेशाध्यक्ष नाना पटोलेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणबाळासाहेब थोरातविजय वड्डटीवारमाजी राज्यमंत्री विश्वजीत कदमखा. रजनी पाटीलखा. चंद्रकांत हांडोरेनसिम खानआमदार संग्राम थोपटेआमदार संजय जगताप आदींसह महाविकास आघाडीइंडिया फ्रंटचे नेते उपस्थित होते.

 

गांधी म्हणालेआम्ही इंडिया आघाडी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेतर दुसरीकडे मोदी संविधान नष्ट करण्यासाठी काम करत आहे. मोदी सरकार संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. दलितआदिवासीनां संविधानामुळे अधिकार आहेत. ज्या‌ दिवसी संविधान जाईलतेव्हा आपण हिंदुस्तानला ओळखणार नाही. त्यामुळे ही लोकसभेची लढाई संविधान वाचवण्याची आहे. जे संविधान आंबेडकरांनी गांधीजींनी आम्हाला दिले ते आम्ही नष्ट होऊ देणार नाही.

 

मोदी‌ कधी म्हणतात आरक्षण संपवणारतर कधी म्हणतातआरक्षणाला हात लावू देत नाही. मोदी आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देत नाहीतत्यांनी तसे आश्वासन कॅमेऱ्यासमोर बोलावे. आम्ही आमच्या  जाहीरनाम्यात ही मर्यादा हटवण्याचे आश्वासन दिले आहे. देशात १५ टक्के दलित८ टक्के आदिवासी५० टक्के ओबीसी  हे ७३ टक्के आरक्षण आहे.

 

मोठे उद्योजकन्यूज चॅनलसंपादक यामध्ये कोणी दलितआदिवासी दिसत नाही. त्यामुळे माध्यमे सर्वसामान्यांचे प्रश्न दाखवत नाहीततर आंबानी आदानींच्या मुलांचे लग्न दाखवतात. देशातील विमानतळं विकलीतरीही माध्यमं काही दाखवत नाहीत. निवडणुक रोख्यांचा भ्रष्टाचार झाला तरीही माध्यमे काहीही दाखवत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक रोखांची माहिती देण्यास सांगितलेत्यानंतर माहिती देण्यात आली.

 

मोदी‌ भ्रष्टाचार साफ करत असल्याचे सांगतातपण भाजपला मिळालेल्या निधीचा हिशोब दिला जात नाही. ज्यांच्यावर कारवाई झालीत्यांना भाजपला निवडणुक रोखे दिले. जी कंपनी कोवीड लस तयार करत होतीतीच कंपनी भाजपला डोनेशन देत होती.

 

देशातील शेतकऱ्यांना २४ वेळा कर्जमाफी दिल्यानंतर जो पैसा‌ खर्च होतोतेवढाच पैसा मोदींनी २२ लोकांना १६ लाख करोड रुपये माफ केला. ६५० हायकोर्टाचे न्यायाधिश आहेतत्यात एकही दलित आदिवासी नाही. देश ९०% लोक चालवत आहेत. यामध्ये तीन ओबीसीतीन दलीतएक आदिवासी आहेत. केवळ सात अधिकारी निर्णय घेतात. महाराष्ट्रउत्तर प्रदेशातही हीच परिस्थिती आहे.

 

कर्नाटकातील रवन्ना ज्याने ४०० महिलांवर अत्याचार केलेत्याला मोदी मत मागतात. ही बाब मोदींना चार महिने आगोदर माहिती होते.

 

मोदी ज्येष्ठ नेत्यांचा आपमान करतातमोदींनी पंतप्रधान पदाचे महत्व राखायला पाहिजेत्यांनी सामान्यांच्या प्रश्नावर बोलायला हवे. कर्जसोनं महाग होतंय आणि हे म्हणतायत विकास होतोय.

 

आमचे सरकार आल्यानंतर आम्ही जातीय जणगणना करणार आहेत. यातून कोणत्या समाजाची किती भागीदारी आहेहे समोर येईल. आम्ही ज्या दिवशी जातनिहाय जनगणना करणार असे म्हंटलेतेव्हापासून मोदी मी ओबीसी आहे म्हणत आहे.

 

पन्नास टक्क्याची मर्यादा उठवल्यानंतर मराठाधनगर व इतर लहान लहान जातींना आरक्षण मिळेल. आदानींनी विमानतळ कबिज केले. रेल्वेचे खासगीकरण केले जात आहे. नरेंद्र मोदी यांनी अग्निवीर योजना आणून दोन प्रकारचे शहीद निर्माण केले. आम्ही सत्तेवर आल्यावर अग्निवीर रद्दजीएसटीमध्ये बदल करून शेतकऱ्यांना वगळून जेवढा पैसा मोदींनी २२ लोकांना माफ केलेतेव्हढे पैसे आम्ही‌ देशातील गोर गरीबांना देणारदेशातील गरीब लोकांची यादी‌ तयार करून प्रत्येक कुटुंबातील एका महिलेस वर्षाला एक लाख रुपये देणारआशा व आंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट वाढवणारशेतकऱ्यांना कर्ज माफीज्या प्रकारे मोदी वारंवार उद्योजकांचे कर्ज माफ करताततशाच प्रकारे किसान कर्ज माफी कमिशन हे जेव्हा जेव्हा सांगतील तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार. पहिली नोकरी मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना वर्षासाठी एक लाख रुपये देणार.

 

मजूरांना चारशे रुपयेपेपर‌ फुटीमुळे विद्यार्थी नुकसान होतेआम्ही याबाबत नवीन कायदा‌ करून पेपर फोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल.

 

महाराष्ट्र काँग्रेसच्या विचारधारेचे राज्य आहे. जनतेने आपली ताकद ओळखायला हवीदेशात परिवर्तन करण्याची‌ ताकद आहेअसेही गांधी म्हणाले.