अधिकार नसताना अतिरिक्त आयुक्तांच्या परस्पर खातेप्रमुख सेवकांच्या करताहेत बदल्या
:खाते प्रमुखांवर प्रशासकीय कारवाईचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा
पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाचे बदली करणेस सक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी/कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत करतात. ही बाब चुकीची असल्याने आगामी काळात खाते प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.
: बदल्यांचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे धोरण महापालिका सभेने मंजूर केलेले आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी – ब ते श्रेणी – ड मधील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी व प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना सुपूर्त केलेले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाचे बदली करणेस सक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी अधिकारी/कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात/खात्यात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत
करतात. सुपूर्त केलेले बदलीचे अधिकार बाबत अवलोकन केल्यास खातेप्रमुख अधिकार नसताना बदली आदेश पारित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठानी दिलेल्या आदेशात परस्पर फेरबदल करणे तसेच वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही.
तरी, सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार अधिकारी/ कर्मचारी यांना बदलीचे खात्यात रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच बदल्यांचे आज्ञापत्रामध्ये / आदेशामध्ये खातेप्रमुख यांनी परस्पर फेरबदल करू नयेत. अशाप्रकारे फेरबदल केल्याचे / बदली आज्ञापत्राची / आदेशाची अंमलबजावणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित खातेप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.
COMMENTS