Punit Balan Group | Oxyrich | माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन
Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन (Oxyrich punit Balan) यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिले होते. तसेच याबाबत बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवण्यात आला होता. बालन यांनी आपला खुलासा माधव जगताप यांना सादर केला आहे. त्यात बालन यांनी म्हटले आहे कि, जगताप यांनी दिलेली सदर नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करिता माझ्या नावे नोटीस दिली आहे. दरम्यान बालन यांच्या खुलाश्यावर महापालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Sky Sign Department)
पुनीत बालन यांचा सविस्तर खुलासा खालीलप्रमाणे :
सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली १४/०९/२०२३ रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे असे वृत्तपत्रात आले आहे. तसेच तुमचे पत्र जावक क्रमांक ई/५७४६ दिनांक ०४/०१/२०२३ सदर मा.उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई यांजकडे सादर केलेले पत्र. सदर पत्रामध्ये तुम्ही नमूद केले आहे की पुणे शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप/ स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन २०१९ पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक ५६४ दिनांक ०९/०९/२०१९ अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत सन २०१९ पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
पुणे शहरात सन २०१९ गणेशउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील ५ वर्षा करिता म्हणजेच सन २०२२ पासून सन २०२७ सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महानगरपालिका, पुणे कडून सार्वजनिक गणेशउत्सव २०२२ करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची ०८/०८/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही पाठवलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा व आयोग्य असून त्यानुसार आपण क्रमांक एल-१०४३ ०३/१०/२०२३ ची आमच्या कार्यालयात ०४/१०/२०२३ रोजी देण्यात
आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच सदर नोटीस केल्या बाबत प्रसारमाध्यमांना देखील कळवावेसबब, ज्याअर्थी या शासनानेच निर्बंधमुक्त” उत्सवाची घोषना केलेली आहे. त्याअर्थी आपणा दंड / विद्रुपीकरण शुल्क इत्यादिची मागणी आमच्याकडे करणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. तसेच अश्या वसुली मिळकतकरातून करण्याबाबत उल्लेख देखील बेकायदेशीर आहे याचीही नोंद घ्यावी.