Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh |Mahavikas Aghadi Pune | क्रीडांगण आरक्षणा वरून महाविकास आघाडी उद्या करणार आंदोलन
Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh | PMC Pune | कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh) संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण (Play Ground Reservation) रद्द करून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबतच्या प्रस्तावास महाविकास आघाडीने विरोध केला आहे. आरक्षण रद्दबातल न करता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच खेळाच्या मैदानाचे आरक्षण कायम ठेवावे. या मागणी साठी महाविकास आघाडी कडून उद्या महापालिका भवनात आंदोलन करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)
कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. हे आरक्षण काढून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव शासन व मनपा स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तसेच सदर आरक्षणाकरिता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला समुचित प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात यावे ही बाब देखील प्रस्तावात नमुद केली आहे. या प्रस्तावानुसार या आरक्षण बदलावर हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या प्रस्तावास महाविकास आघाडीने विरोध केला आहे. मैदानाचे आरक्षण ठेवावे या मागणीसाठी महाविकास आघाडी कडून उद्या महापालिका भवनात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे हे उपस्थित राहणार आहेत.