Pune Water Cut | पुणे शहराच्या या भागात दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद!
PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) – शुक्रवार रोजी लष्कर पाणीपुरवठा येथे रामटेकडी टाकीला पाणीपुरवठा करणारी मुख्य पंपिंग लाईन अचानक फुटल्याने त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे. त्यामुळे रामटेकडी टाकीच्या अखत्यारीतील भागाचा शुक्रवार ते शनिवार पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार रोजी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Water Cut News)
पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-
लष्कर जलकेंद्र भाग :-
संपूर्ण हडपसर, हडपसर गावठाण, ससाणे नगर, रेल्वे लाईन कडेचा भाग, मंत्री मार्केट, गंगा रेसिडेन्सी, साईनाथ वसाहत, गाडीतळ, चिंतामणी नगर, सय्यदनगर, हडपसर इंड्रस्ट्रीयल इस्टेट, शिंदेवस्ती, भीमनगर, संपूर्ण रामटेकडी, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, हेवनपार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदुवाडी, आनंदनगर, एस. आर. पी. एफ. महंमदवाडी गाव, तरवडेवस्ती, कृष्णानगर, सातवनगर, राजीव गांधीनगर, दोराबजी पॅराडाईज, कडनगर बुस्टरवरील भाग, तुकाई दर्शन टाकी – सातववाडी, गोंधळेनगर, उन्नतीनगर व काळेपडळ, हडपसर सोलापूर रोड डावी बाजू, साडेसतरा नळी, भोसले गार्डन, माळवाडी, मगरपट्टा सिटी, हडपसर आकाशवाणी, पिंगळेवस्ती, मुंढवा, केशवनगर, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड, सातवनगर, गुलामआली नगर, श्रीराम चौक परिसर, रामटेकडी, रामनगर परिसर अंतर्गत होणारा भागातील पाणीपुरवठा.

COMMENTS