Pune Water cut on Thursday | पुणे शहरात उद्या (गुरुवारी) या भागात पाणीपुरवठा राहणार बंद 

Homeadministrative

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात उद्या (गुरुवारी) या भागात पाणीपुरवठा राहणार बंद 

Ganesh Kumar Mule Feb 11, 2026 1:55 PM

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार
AAP | रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश
PMC Education Department | गुणवंत शिक्षकांवरच शिक्षण विभागाची मदार | मुरलीधर मोहोळ

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात उद्या (गुरुवारी) या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

 

Pune Water Supply – (The Karbhari News Service) – गुरुवार (उद्या)  रोजी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र टप्पा-१ चे रॉ वॉटर पाईप लाईनवर डमी प्लेट (बंद प्लेट) मागणेकरिता व वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन नवीन किओस्क बसविणेचे कामासाठी वडगाव जलकेंद्र अखत्यारीतील भागाचा सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (PMC Water Supply Department)

तसेच शुक्रवार  रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग :-

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग ३८ मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग ४१ व येवलेवाडी परिसर इ.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: