Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या या भागात पाणीपुरवठा राहणार बंद
Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी याबाबतची नोंद घ्यावी व सहकार्य करावे. असे आवाहन प्र अधिक्षक अभियंता लष्कर पाणीपुरवठा विभाग यांनी केले आहे. (Pune Water Supply)
पाणीपुरवठा बंद असणारा भाग खालील प्रमाणे आहे.
येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगर (अंशत:), कस्तुरबा वसाहत, मोहवाडी, जाधवनगर इत्यादी परिसर.

COMMENTS