Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

HomeBreaking Newsपुणे

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

गणेश मुळे Jul 22, 2024 4:39 PM

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी पूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद! | शुक्रवारी कमी दाबाने पाणी
Pune water Crisis | पुण्याच्या उशाला 4 धरणं तरीही 4 लाख टँकर ने पुणेकरांची भागवली जातेय तहान!
Pune Water cut on Thursday | पुण्यातील या परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद! 

Pune Water cut on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

PMC Water Supply Department – (The Karbhari News Service) –  येत्या गुरुवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Water Cut)

पर्वती जलकेंद्र अंतर्गत असलेल्या MLR टाकी वरून भवानी पेठ कडे जाणाऱ्या ६०० मिमी व्यासाच्या एम. एस. लाईनवर स्वारगेट मेट्रो स्टेशन समोर मोठ्या प्रमाणात गळती होत असून सदर गळतीतातडीने थांबविणेकरिता गुरुवार  रोजी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग:

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पर्वती MLR टाकी परिसर :

शंकर शेठ रोड परिसर, गुरुवार बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंद नगर, महर्षि नगर चा काही भाग, tmvकॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी, इ.