Pune : Water Cut in Some Areas : शहराच्या या भागात गुरुवारी पाणी बंद! 

HomeपुणेBreaking News

Pune : Water Cut in Some Areas : शहराच्या या भागात गुरुवारी पाणी बंद! 

Ganesh Kumar Mule Mar 08, 2022 3:07 AM

Repaired 90% potholes | महापालिकेचा ९०% खड्डे दुरुस्त केल्याचा दावा  | शहरात मात्र खड्डेच खड्डे 
Pune Metro : पहिल्या दिवशी 37 हजार तर दुसऱ्या दिवशी 18 हजार लोकांचा पुणे मेट्रोने प्रवास
Department of Property and Management : PMC : महापालिकेने हडपसर मधील 36 गाळे घेतले ताब्यात 

शहराच्या या भागात गुरुवारी पाणी बंद!

पुणे : महापालिकेकडून होळकर तसेच वडगाव जलकेंद्रा अंतर्गत विद्युत तसेच देखभाल दुरूस्ती विषयक कामे करण्यात येणार असल्याने येत्या गुरूवारी ( दि.10 ) रोजी वडगाव जलकेंद्र तसेच होळकर जलकेंद्रा अंतर्गत केला जाणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यात, सिंहगड रस्ता, कात्रजचा काही भाग तसेच येरवडा परिसरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी (दि.11) उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

 

पाणी बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परीसर-हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

नवीन होळकर जलकेंद्र : मुळा रोड, संपूर्ण खडकी परिसर, अम्युनेशन फॅक्‍टरी, हरीगंगा टाकीवरील संपूर्ण परिसर,हरीगंगा सोसायटी , राम सोसायटी, फुले नगर, इंदिरा नगर, स्वातंत्र सैनिक नगर, आंबेडकर नगर, पोरवाल पार्क, पंचशील नगर, प्रतिक नगर, मोहनवाडी,कस्तुरबा सोसायटी, श्रमिक वसाहत, जाधव नगर, मेंटल हॉस्पिटल वसाहत,मोक्षे नगर, राजकपूर सोसायटी,व माझी सैनिक नगर

 

जुने होळकर जलकेंद्र – एच.ई फॅक्‍टरी व एम.ई.एस.