Pune Water Supply | दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द | सणासुदीत पुणेकरांना दिलासा

दिवाळीच्या काळात गुरुवारीही पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार.

Homeadministrative

Pune Water Supply | दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द | सणासुदीत पुणेकरांना दिलासा

Ganesh Kumar Mule Oct 29, 2026 7:25 PM

PMC : Irrigation : महापालिकेसोबत नेहमीच पत्रयुद्ध खेळणारे पाटबंधारे आता साधणार समन्वय! 
International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 
Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 

Pune Water Supply | दिवाळीत गुरुवारची पाणी कपात रद्द | सणासुदीत पुणेकरांना दिलासा

| स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Pune Water Cut – The Karbhari News Service –  दिवाळीच्या सणासुदीत पुणेकरांची पाण्यासाठी गैरसोय होऊ नये, यासाठी दर गुरुवारी करण्यात येणारी पाणी कपात दिवाळीच्या काळात रद्द करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीत गुरुवारीही शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.  (Shrinath Bhimale PMC Standing Committee)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध साठ्याचे नियोजन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरांची स्वच्छता, फराळाची तयारी, पाहुण्यांची वर्दळ आणि इतर कारणांमुळे पाण्याची मागणी वाढते. अशा परिस्थितीत गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिवाळीच्या काळात गुरुवारची पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0