Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे महापौरांचे आदेश

Homeadministrative

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे महापौरांचे आदेश

Ganesh Kumar Mule Mar 30, 2026 9:28 PM

Mahatma Phule Mandai | Pune | मेट्रो आणि पुणे मनपाच्या संयुक्त विद्यमाने  महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट
Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी 
PMC House Leader Ganesh Bidkar | पुणे महापालिका सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची निवड | महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

Pune Unseasonal Rain | अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करण्याचे महापौरांचे आदेश

 

Mayor Manjusha Nagpure – (The Karbhri News Service) – अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा  नागपूरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Rain News)

महापौरांच्या निर्देशानुसार शहरातील झाडांची छाटणी, धोकादायक फांद्या हटविणे, तसेच नाल्यांची व गटारांची साफसफाई ही कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

यासोबतच आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच महानगरपालिकेच्या १ ते ५ परिमंडळातील उपायुक्तांना तत्काळ आणि प्रभावी कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक :
📞 02025506800
📞 02025501269

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: