Pune Street Light | झाडांच्या फांद्यांमुळे स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात अडथळा | झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

Pune Street Light | झाडांच्या फांद्यांमुळे स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात अडथळा | झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 18, 2025 9:27 PM

Bhimashankar | राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
Katraj-kondhva Road | कात्रज-कोंढवा रोड बाबतचा आयुक्तांचा दावा ठरला फोल!
PMC Recruitment Update News | महापालिकेत विविध पदांच्या भरतीसाठी 87 हजार 471 अर्ज दाखल 

Pune Street Light | झाडांच्या फांद्यांमुळे स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात अडथळा | झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

 

Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील विशेषतः मुख्य रस्त्यांवरील सार्वजनिक प्रकाश व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राहणे हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांमुळे स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पुरेशा प्रकाशाचा अभाव निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्त्यांवरील प्रकाशयोजनेत अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची तातडीने पुढील १५ दिवसांत छाटणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

अतिरिक्त आयुक्तांनी आदेशित केले आहे कि,  उद्यान विभागाकडील कर्मचारी तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील शाखा/ कनिष्ठ विद्युत अभियंता यांनी मुख्य रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकाशयोजनेत अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी समन्वयाने व तातडीने पूर्ण करावी. तसेच सर्व महापालिका सहायक आयुक्त यांनी उद्यान विभागामार्फत क्रेन गाडी उपलब्ध करून देण्यासाठी आणि झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची कार्यवाही करणेसाठी आवश्यक तो समन्वय साधावा. छाटणी करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री व सुरक्षितता उपाययोजना सुनिश्चित कराव्यात. छाटणी झाल्यानंतर संबंधित विद्युत कर्मचारी यांनी त्या ठिकाणावरील प्रकाशयोजना व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करून घ्यावी व आवश्यक असल्यास तत्काळ दुरुस्ती करावी.
तरी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील शाखा / कनिष्ठ विद्युत अभियंता, उद्यान विभागाकडील कर्मचारी तसेच सर्व महापालिका सहायक आयुक्त यांनी नेमून दिलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच  मोहिमेंतर्गत केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल अतिरिक्त आयुक्त  कार्यालयाकडे १५ दिवसांत सादर करावा. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी. यांनी आदेश दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: