Pune Signal Traffic | पुणे महापालिकेनं ठरवलंय पुणेकरांना वाहतूक कोंडीतच अडकवून ठेवायचं!

HomeपुणेBreaking News

Pune Signal Traffic | पुणे महापालिकेनं ठरवलंय पुणेकरांना वाहतूक कोंडीतच अडकवून ठेवायचं!

गणेश मुळे May 16, 2024 6:52 AM

Pune Municipal Corporation Budget | पुणे महापालिकेच्या बजेट विषयी माजी स्थायी समिती अध्यक्षांना काय वाटते?
 Pune Municipal Corporation (PMC) has decided to keep Pune people stuck in traffic!   |  There is no provision in the budget for signal systems and repairs
8 crores proposed for PMC Futuristic schools and 31.50 crores provision for DBT scheme!

Pune Signal Traffic | पुणे महापालिकेनं ठरवलंय पुणेकरांना वाहतूक कोंडीतच अडकवून ठेवायचं!

 | सिग्नल यंत्रणा आणि दुरुस्तीसाठी बजेटमध्ये तरतूदच नाही

Pune No Traffic Signal – (The Karbhari News Service) – पुणेकर नागरिक वाहतूक कोंडीच्या (Pune Traffic Congestion) समस्येने त्रस्त आहेत. यात नागरिकांचा वेळ तर जातोच शिवाय जीव मुठीत घेऊन देखील प्रवास करावा लागतो. या समस्येवर  पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) उपाय शोधणं अपेक्षित आहे. मात्र ते करण्यापेक्षा महापालिकेने पुणेकरांना वाहतूक कोंडीतच अडकून ठेवायचं ठरवलेले दिसतंय. कारण लेखा विभागाने यंदाच्या अर्थसंकल्पात (PMC Budget 2024-25) वाहतूक यंत्रणा आणि सिग्नल (Pune Signal System) दुरुस्तीसाठी तरतूदच केली नाही. दरम्यान ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता विद्युत विभागाने तरतूद करून घेण्यासाठी धावपळ सुरु केली आहे. (PMC Electricity Department)
वाहतूक कोंडी ही पुणे शहरातील प्रमुख समस्या आहे. दररोज वाहनांच्या लांबच लांब लागणाऱ्या रांगामुळे पुणेकर त्रासून गेले आहेत. महापालिका याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना करू शकलेली नाही. वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी शहरातील सिग्नल यंत्रणा मजबूत असायला हवी आहे. मात्र पुणे महापालिका प्रशासन याबाबत देखील उदासीन असल्याचे दिसून आले आहे. सिग्नल दुरुस्तीसाठी बजेटमध्ये तरतूदच करायला विसरणं, हे पुणेकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
शहरात एकूण 250 सिग्नल आहेत. त्यातील 125 सिग्नल पुणे स्मार्ट सिटी कडून चालवले जातील. बाकी 125 सिग्नलवर पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिस यांचे नियंत्रण असते. दुरुस्तीचा आणि मनुष्यबळाचा सगळा खर्च महापालिका करते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात 2 ते अडीच कोटींची तरतूद केली जाते. दोन वेगवेगळे टेंडर काढून हे काम केले जाते. अंदाजपत्रकात RE -13 या यादीनुसार  RE20B121/R13 – 103 या बजेट कोड अंतर्गत पुणे शहरात नव्याने सिग्नल यंत्रणा उभारणे आणि जुने सिग्नल दुरुस्त करणे, यासाठी तरतूद केली जाते. मात्र 2024-25 च्या बजेटमध्ये यासाठी तरतूदच दिसून येत नाही.
पावसाळ्याच्या दिवसात शहरातील सिग्नल हमखास बिघडतात. पाऊस आणि वाऱ्याने पोल पडतात. कधीकधी आपोआप दिव्यांची लाईट चालू बंद होते. यामुळे वाहतुकीवर परिणाम होतो. यावर नियंत्रण ठेवण्याचं काम वाहतूक पोलिस करतात. त्यांच्याकडून तक्रार आल्यानंतर दुरुस्ती केली जाते. यासाठी महापालिकेने 2 जीप उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ड्राइवर, इंजिनियर आणि पोलिसांचा मदतनीस (चार्ली) असतो. महापालिका दरवर्षी दोन टेंडर काढून हे काम करवून घेते. मात्र यंदा बजेटच नसल्याने याबाबत कुठली प्रक्रिया झालेली नाही. मात्र महापालिकेच्या या कारभाराबाबत आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिग्नल दुरुस्तीसाठी अंदाजपत्रकात तरतूद नाही, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही तात्काळ महापालिका आयुक्तांना तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत पत्र दिले आहे. वर्गीकरणच्या माध्यमातून बजेट उपलब्ध करून घेऊन याची टेंडर प्रक्रिया केली जाईल.
श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, पुणे महापालिका.