Pune Shivsena | भाजपने त्या माजी नगरसेवकांना तंबी द्यावी अन्यथा… | शिवसेनेचा इशारा !
Pune Politics – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील उबाठा (Shivsena UBT Pune) गटाच्या ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये (BJP Pune) प्रवेश केला. यावेळी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचं वक्तव्य केले असता शिवसेना (Shivsena Pune) आक्रमक झाली असून भाजपातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या केलेल्या वक्तव्याबाबत यांची कान उघडणे करावी तसेच त्यांनी आता कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे याबाबत माहितीही द्यावी असा टोला लगावला आहे. शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख सुधीर कुरूमकर आणि शहर प्रवक्ते अभिजित बोराटे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान खरी शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी या ५ नगरसेवकांच्या दाखल्याची गरज नसल्याचे उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर यांनी म्हटले आहे. (Pune News)
पुणे शहरातील उबाठा गटाच्या ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, यावेळी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असे प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत सांगितले . शिवसेना उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर आणि शहर प्रवक्ते अभिजित बोराटे यांनी पत्रकार परिषद घेत आपली स्पष्ट भूमिका मांडली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहरातील ५ नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी मुंबई येथे प्रवेश केला आहे
या केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत खरी शिवसेना कोणाची हे सांगण्यासाठी या ५ नगरसेवकांच्या दाखल्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला भरघोस मतदान करून उबाठा पेक्षा जास्तीत जास्त आमदार व खासदार निवडून दिले यावरूनच स्पष्ट झाले आहे की खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचे सुधीर कुरूमकर यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर शहर प्रवक्ते अभिजित बोराटे म्हणाले की, पुणे शहरातील ज्या ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते सत्तेच्या मोहापोटी केला आहे. ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यावर टीका करण्याएवढी त्यांची पात्रता नसल्याचे त्यांनी म्हंटले असून भाजपच्या नेत्यांनी आता यांना तंबी देऊन कानउघडणी करावी आणि महायुती धर्म पाळावा नाहीतर आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका मांडली. याप्रसंगी यावेळी शिवसेनेचे शहर प्रवक्ते अभिजीत बोराटे, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, युवासेना उपशहर प्रमुख विशाल सरोदे, पुणे शहर अनुसूचित जाती जमाती प्रमुख प्रदीप धिवार व पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS