Pune Shivsena Agitation against Sharad Pawar | ज्ञानेश महाराव वादग्रस्त वक्तव्यबाबत हडपसर मध्ये शरद पवारांविरुद्ध निषेध आंदोलन!

HomeBreaking News

Pune Shivsena Agitation against Sharad Pawar | ज्ञानेश महाराव वादग्रस्त वक्तव्यबाबत हडपसर मध्ये शरद पवारांविरुद्ध निषेध आंदोलन!

Ganesh Kumar Mule Sep 13, 2024 6:43 PM

MP Supriya Sule | Drought in Maharashtra | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी
Old Pension Scheme | CM Eknath Shinde | जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
Nana patole on PM Modi | महाराष्ट्रात मते मागण्याचा मोदींना अधिकार नाही : नाना पटोले

Pune Shivsena Agitation against Sharad Pawar | ज्ञानेश महाराव वादग्रस्त वक्तव्यबाबत हडपसर मध्ये शरद पवारांविरुद्ध निषेध आंदोलन!

 

Dnyanesh Maharao – (The Karbhari News Service) –  लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे केलेले विधानाचे बोलविते धनी शरद पवार आहेत. असा आरोप करत पवार यांच्या विरोधात प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांच्या नेतृत्वात  शिवसेनेच्या वतीने हडपसर मधील श्रीराम चौकात निषेध आंदोलन करण्या आले.

एकीकडे काही दिवसांपासून शरद पवारांची हिंदू मंदिरांना भेट देण्याची कृतीही येणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून हिंदू मतदारांना आकृष्ट करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. तर  दुसरीकडे तथाकथित लेखकांकरवी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे काम शरद पवार करीत असल्याचे असल्याचे शिवसेना शहर प्रमुख प्रमुख नाना भानगिरे यांनी सांगितले.

यावेळी विविध घोषणा असलेले पोस्टर शिवसैनिकांनी हातात धरून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.  प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शरदचंद्र पवार यांना हिंदू धर्मियांचा पुळका आलेला असून विविध देवालयांना मंदिरांना भेट देत आम्हीच कसे हिंदू धर्मियांचे खरे संरक्षक आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना गेल्या 32 वर्षात जे कधीही लालबागच्या राजाचे दर्शन घेऊ शकले नाही. त्यांना निवडणुका जवळ येताच देवाधिकांची नावं आठवायला लागतात. हिंदू धर्मियांचा खुल्या अपमान करणाऱ्या त्यांच्या बगलबच्च्यांना आत्तापर्यंत त्यांनीच अभय दिलेले आहे. त्यामुळे शरद पवार यांचे चेहऱ्या मागचा चेहरा हा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला माहीत असून शरद पवार यांनी आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिंदू धर्मांच्या भावना आणि हिंदू धर्मांच्या व्रतवैकल्यांचा वापर करू नये.  किमान राज्यातील जनता अत्यंत सुज्ञ आहे याचा तरी विचार करावा. असेही भानगिरे म्हणाले.

यावेळी प्रमोद नाना भानगिरे, अभिजित बोराटे, अमर घुले, स्मिता साबळे, नाना तरवडे, प्रकाश लाकडे, आकाश रेणुसे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0