Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

HomeBreaking Newsपुणे

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

गणेश मुळे Jul 25, 2024 3:32 PM

BJP Pune Delegation लोकसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांतील दोष दूर करा! |भाजपा शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Vidhansabha Election | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ
Use of Social Media | निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांच्या वापरावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष | निवडणूक कालावधीत समाजमाध्यमांचा वापर डोळसपणे करावा– जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

Pune School Closed- (The Karbhari News Service) – भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार आज (२५ जुलै) शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे उद्या (२६ जुलै) देखील पुणे शहर आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)

जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील
शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे. तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग
सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. (Pune News)

या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ जुलै २०१४ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे. असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती
व्यवस्थापनाचे कामकाज करावे. असेही आदेशात म्हटले आहे.