Pune RTO | दिवाळीच्या सुमारास खासगी बस गाड्यांच्या भाड्यावर नियंत्रण ठेवा | माजी आमदार मोहन जोशी यांची आरटीओकडे मागणी
Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – दिवाळीच्या सुमारास परगावी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांचे भाडे नियंत्रित ठेवले जावे, याकरिता ठोस उपाययोजना करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) बैठकीत आज बुधवारी केली. (Pune News)
या आणि अन्य मागण्यांसाठी आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड आणि अधिकाऱ्यांसमवेत मोहन जोशी यांची बैठक झाली. यावेळी ड्रायव्हिंग स्कूल क्लासचे १००प्रतिनिधी तसेच काँग्रेसचे चेतन आगरवाल, सुरेश कांबळे,आदी उपस्थित होते. दिवाळी सणामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. त्याचा फायदा उठविण्यासाठी खासगी बस गाड्यांचे भाडे अवाच्या सव्वा आकारले जाते,अशा तक्रारी आहेत.याकरिता आरटीओने आतापासून उपाय योजना आखून भाडे दर नियंत्रित आणि निश्चित ठेवावेत,दरपत्रक वर्तमान पत्रात जाहीर करावे,ॲप तयार करावे, त्याद्वारे प्रवाशांशी संपर्क ठेवावा ,अशा मागण्या मोहन जोशी यांनी केल्या.
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो स्थानकांना जोडणारी रिक्षा वाहतूक सुरू व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.त्याकरिता फिडर रिक्षा सेवा तातडीने सुरू करावी,असेही त्यांनी सुचविले.
महिला आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी चेकिंग आणि स्कूल बस मध्ये महिला कर्मचारी तैनात करावयास लावावे याची कडक अंमलबजावणी करावी, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकाराला आळा घालण्यासाठी दिवस रात्र तपासणी व्हावी अशीही मागणी करण्यात आली. रिक्षा परवाना शुल्क दहा हजार रूपये आहे आणि परमिट ट्रान्स्फर शुल्क पंचवीस हजार रुपये आहे.ही विसंगती अन्यायकारक आहे. तरी दोन्ही शुल्क समान म्हणजे दहा हजार रुपये इतकेच ठेवावे, असे मोहन जोशी यांनी बैठकीत मागणी केली.
तसेच पुणे शहरातील विविध ब्लॅक स्पॉट व त्या ठिकाणी होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने आरटीओ पुणे व वाहतूक शाखा पुणे शहर यांच्या वतीने संयुक्तरीत्या प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी ब्लॅक स्पॉट शोधून त्या ठिकाणी अपघात कमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. सारथी 4.0 व वाहन 4.0 या पोर्टलवर वाहनधारक व वाहन चालक येणाऱ्या मोबाईल नंबर अपडेट च्या संदर्भात आवश्यक त्या सुधारणा परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या मान्यतेने एन आय सी यांना कळवून योग्य ते बदल नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात येईल असे ठरले. फेसलेस सेवा 58 प्रकारच्या परिवहन विभाग भारत सरकार यांनी सप्टेंबर 2022 पासून लागू कराव्यात वरील 58 प्रकारच्या फेसलेस सर्विसेस लागू करण्यासाठी योग्य ती अंमलबजावणी करण्याचे ठरले. फेसलेसलर्निंग मध्ये रिलेटिव्ह नेम नॉट फाउंड तसेच फेसलेस एन्डोर्समेंट शिकाऊ लायसन्स प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने याची अंमलबजावणी त्वरित करण्याचे ठरले. सारथी 4.0 या संकेतस्थळावर सहा कोटीपेक्षा जास्त वाहन चालकांची नोंद झालेली आहे त्यांना दुसऱ्या प्रवर्गासाठी शिकाऊ लायसन्स काढावयाचे असेल त्यांना हे लायसन घरून काढता आले पाहिजे व ही सेवा त्वरित लागू करण्यात यावे. वाहन चालक व वाहन मालकांच्या विविध प्रश्नांवर सदर प्रसंगी चर्चा करण्यात आली.
.
या बैठकीला राजू घाटोळे,विजयकुमार दुग्गल, नितीन भांबुरे, एकनाथ ढोले, महेश शेळमकर, विठ्ठल मेहता यशवंत कुंभार, अनंत कुंभार, विनोद वरखेडे, निलेश गांगुर्डे आदी मोटार ड्रायव्हींग स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आस्थित होते
COMMENTS