Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी 

HomeBreaking Newsपुणे

Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी 

गणेश मुळे Feb 23, 2024 5:43 AM

Savitribai Phule Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी | अजित पवार
PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक! 
PMU Meeting Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा

Pune River Pollution | नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात! | मिळकत धारकांना स्वतःचा STP प्रकल्प करणे बंधनकारक करण्याची मागणी

| नगरसेवक हरिदास चरवड यांची पालकमंत्र्याकडे तक्रार

 

Pune River Pollution | पुण्यातील नद्यांच्या प्रदूषणामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नद्यात पाणी सोडताना प्रक्रिया करून सोडले जाणे आवश्यक आहे. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हरिदास चरवड (Haridas Charwad BJP Pune)  यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तक्रार केली आहे.

 

चरवड यांच्या निवेदनानुसार पुणे शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे सिंहगड भागात आहेत, मोसी, मुठा आणि आंबी या नद्यांवर वरसगाव, पानशेत, खडकवासला अशा धरणांची निर्मिती करण्यात आली आहे. पानशेत धरण परिसर ते खडकवासल्यापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात नागरिकीकरण झालेली आहे. गावे तसेच लोकवस्ती नव्याने निर्माण होत आहेत तसेच नदीकिनारी दोन्ही बाजूला मोठ मोठे पंचतारांकित रिसॉर्ट्स, हॉटेल तसेच फार्म हाऊस झालेली आहे. सदर सर्व विकसित झालेल्या भाग त्यांचे सर्व ड्रेनेजचे पाणी कोणतीही प्रक्रिया नकरता थेट नदीमध्ये सोडत आहे. तसेच नदी लगतच्या सर्व ग्रामपंचायतीकडे स्वतःचे मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) नसल्याने नाईलाजास्तव ग्रामपंचायतींना मैलापाणी नदीमध्ये सोडावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी अस्वच्छ व प्रदूषित होत आहे. पुढे हे पाणी कालव्यांद्वारे पुणेकरांना पिण्यासाठी तसेच ग्रामीण भागात शेतीसाठी सोडले जात आहे.

या बाबत सर्वेक्षण करून सर्व मिळकत धारकांना स्वतःचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP ) किंवा तत्सम कार्यप्रणाली बंधनकारक करावी तसेच मैलापाणी नदीमध्ये सोडण्यास बंदी घालण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष नगरसेवक हरिदास चरवड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेस पुणे जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त आणि मुख्य अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग , सिंचन भवन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाण्याची कमतरता पाहता खडकवासला धरणासह इतर दोन धरणांमधील गाळ पुणे मनपाद्वारे द्वारा काढल्यास खडकवासला धरणाची साठवण क्षमता वाढेल व नद्यांच्या पाण्याचा पुरेपूर वापरही होईल शहरांमध्ये होणारी प्रचंड वाढ भविष्यकाळामध्ये मोठ्या संकटाला आमंत्रण आहे. बांधकामांना वाढवून दिलेले FSI, मेट्रो FSI, विकत मिळणारे FSI, यामुळे यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे.

1. खडकवासला धरणाच्या वरील म्हणजे पानशेत वरसगाव धरणा पर्यंतची नद्या गाळ काढून स्वच्छ करून घ्याव्यात.
2. वरसगाव , पानशेत ते खडकवासला धरण क्षेत्रातील नद्यांलगतच्या सर्व ग्रामपंचायतीस मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे जागा आणि निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा.
3. खाजगी मिळकतदारांना मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प ( STP ) किंवा तत्सम कार्यप्रणाली ( छोटे युनिट, नैसर्गिक प्रकल्प) बंधनकारक करावा.
याबाबत तातडीने सर्वे व्हावा अशी मागणी हरिदास चरवड यांनी केली आहे.