Pune Property tax | मिळकत करवाढीचा प्रस्ताव स्थायी समिती समोर | २० फेब्रुवारी च्या अगोदर विषय मान्य होणे आवश्यक
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका प्रशासनाने मिळकत करात वाढ करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे. याबाबत सोमवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीत निर्णय होणार आहे. दरम्यान हा विषय स्थायी समितीत मंजूर जरी झाला तरी २० फेब्रुवारी च्या अगोदर तो मुख्य सभेत मान्य होणे आवश्यक असते. त्यामुळे याबाबत नवीन नगरसेवक निर्णय घेतील. मात्र पहिलाच निर्णय नगरसेवक कर वाढीचा घेतील, याची शक्यता मात्र धूसर आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
मिळकत करात १० टक्के वाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीत ऐन वेळी दाखल करण्यात आला. मात्र समितीची बैठक अजित पवार यांना श्रद्धांजली देऊन तहकूब करण्यात आली. आता सोमवारी समितीची बैठक होणार आहे. त्यात यावर निर्णय होईल.
दरम्यान स्थायी समितीत कर वाढीचा प्रस्ताव मान्य झाल्या नंतर यावर मुख्य सभेची मोहोर लागणे आवश्यक असते. शिवाय नियमानुसार २० फेब्रुवारी च्या अगोदर हा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक आहे. मात्र अजून मुख्य सभेची बैठक ठरलेली नाही. ही मुख्य सभा आता नगरसेवक आल्यानंतर होईल.
दरम्यान महापौर आणि उपमहापौर हे ९ फेब्रुवारी ला ठरणार आहेत. यात सर्व समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर २० च्या अगोदर मुख्य सभा आयोजित केली जाऊ शकते. यात कर वाढी बाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र नगरसेवक पहिला निर्णय हा कर वाढ करण्याचा घेतील, याची शक्यता कमी आहे. असे सांगितले जात आहे.
—-

COMMENTS