Pune Property Tax | अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस | मतदान मुळे ऑनलाईन भरणा करण्याचे प्रशासनाचे आवाहन
PMC Property tax Abhay Yojana – (The Karbhari News Service) – मिळकत कर विभागाच्या अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे. १५ जानेवारी रात्री ८ वाजेपर्यत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महापालिका निवडणुकीमुळे लोकांनी ऑनलाईन भरणा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. आता नगरसेवक आल्यानंतर मुख्य सभाच यावर निर्णय घेऊ शकते. (PMC Property tax Department)
दरम्यान मिळकत कर विभागाला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २५०० कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.
पुणे महानगरपालिकेने मिळकतकर अभय योजना २०२५-२६ जाहीर केली आहे. या अंतर्गत सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी व्याजाच्या / शास्तीच्या रकमेवर ७५% सरसकट सूट देण्यात आली आहे. योजनेची मुदत १५ जानेवारी २०२६ रोजी समाप्त होत आहे.
अभय योजना कालावधीतच पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाय म्हणून काही क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्र उद्या बंद राहतील. त्यामुळे त्याठिकाणी मिळकत कर भरणा करता येणार नाही.
त्यामुळे नागरिकांनी मिळकतकर भरणा ऑनलाइन पद्धतीने तसेच क्षेत्रीय कार्यालय व संपर्क कार्यालय येथील उपलब्ध नागरी सुविधा केंद्रावर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिळकतकर भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळकत कर भरणा propertytax.punecorportion.org या लिंक द्वारे तसेच QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.
पुणे महानगरपालिका मुख्य कार्यालय शिवाजीनगर येथे १५ जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ वाजेपर्यंत मिळकत कर भरणा स्विकारण्यात येईल.
मिळकतकर भरण्यासाठी धनादेश खालील नावाने काढावा.
कर आकारणी व कर संकलन प्रमुख, पुणे म.न.पा.
THE ASSESSOR & COLLECTOR OF TAXES PMC PUNE.

COMMENTS