Pune Property Tax | सवलतीत मिळकत कर भरण्याचा कालावधी ७ जुलै पर्यंत वाढवला | सर्व्हर डाऊन झाल्याने कर भरण्यात नागरिकांना अडचणी 

Homeadministrative

Pune Property Tax | सवलतीत मिळकत कर भरण्याचा कालावधी ७ जुलै पर्यंत वाढवला | सर्व्हर डाऊन झाल्याने कर भरण्यात नागरिकांना अडचणी 

Ganesh Kumar Mule Jun 30, 2025 7:32 PM

NCP Youth | April Fool | “एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस” | राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन
AAP | रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश
PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Pune Property Tax | सवलतीत मिळकत कर भरण्याचा कालावधी ७ जुलै पर्यंत वाढवला | सर्व्हर डाऊन झाल्याने कर भरण्यात नागरिकांना अडचणी

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – मिळकत करत ५ ते १० टक्के सवलत मिळवण्यासाठी नागरिकांना ३० जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र महापालिका प्रशासनाकडून हा कालावधी वाढवून देण्यात आला आहे, नागरिक आता ७ जुलै पर्यंत कर भरून सवलत घेऊ शकतात. अशी माहिती उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी दिली. (Avinash Sapkal PMC)

  • १२४४ कोटी जमा 

आज अखेर ७,१०,५५३ इतक्या मिळकतधारकांनी १२४४.५० कोटी इतका मिळकत धारकांनी मिळकतकराचा भरणा केला आहे. ०१ मे २०२५ ते ३० जून २०२५ अखेर मिळकतीचा संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतदारांना देण्यात येणाऱ्या ५% अथवा १०% सवलत यापूर्वी ३० जून २०२५ पर्यंतची देण्यात आली होती. सदरील मुदत ०७ जुलै २०२५ पर्यंत वाढविणेत आली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी १० ते ४ पर्यंत सुरु राहतील. तरी, सर्व मिळकतधारकांना आवाहन करण्यात आले आहे की, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आपला मिळकतकर नागरी सुविधा केंद्र तसेच ऑनलाईनद्वारे त्वरित भरण्यात यावा.

  • मनपा भवन आणि क्षेत्रीय कार्यालयात देखील नागरिकांची ससेहोलपट

सवलतीत मिळकत कर भरण्याचा आजचा म्हणजे सोमवारचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नागरिकांनी सवलत मिळण्यासाठी मनपा भवन आणि क्षेत्रीय कार्यालयात कर भरणा केंद्रात रांगा लावल्या होत्या. मात्र कर भरणा करण्याचा सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने नागरिकांना बराच काळ रांगेतच उभे राहावे लागत होते. एकाच वेळी सगळीकडे ही स्थिती आल्याने नागरिकांची चांगलीच ससेहोलपट झाली. तरी विभागाने गुरुवार पासून इतर सर्व कामे बंद करून फक्त कर भरणा सुरु ठेवला होता. असे असताना देखील आजच्या दिवशी सर्व्हर ची तांत्रिक समस्या आलीच. प्रशासनाला दरवर्षी या गोष्टीची कल्पना असते, असे असताना सर्व्हर बाबत एवढी उदासीनता का, असा प्रश्न नागरिक विचारत होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: