Pune Property Tax Bill | मिळकत कराच्या बिलांवर ४०% सवलत दिल्याचा उल्लेख छापण्यात महापालिका अपयशीच | विवेक वेलणकर यांचा आरोप

HomeBreaking News

Pune Property Tax Bill | मिळकत कराच्या बिलांवर ४०% सवलत दिल्याचा उल्लेख छापण्यात महापालिका अपयशीच | विवेक वेलणकर यांचा आरोप

Ganesh Kumar Mule May 05, 2025 8:25 PM

The process of distribution of 12 lakh property tax bills to Pune residents has started!
PMC PT 3 Application form | प्रॉपर्टी टॅक्स विभाग घेणार अतिरिक्त 500 कर्मचारी | शहरातील 4 लाख मिळकतींचा केला जाणार सर्वे! 
Pune Properties Survey | | PT 3 Application |  नागरिकांचा विरोध सहन करूनही सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे!  | १४ ऑगस्ट पर्यंत सर्व्हे संपवणार

Pune Property Tax Bill | मिळकत कराच्या बिलांवर ४०% सवलत दिल्याचा उल्लेख छापण्यात महापालिका अपयशीच | विवेक वेलणकर यांचा आरोप

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले कि, मिळकतकरातील ४०% सवलतीवरुन मध्यंतरी खूप मोठा गदारोळ झाला होता. आपल्याला ही सवलत मिळते की नाही हेच मुळी मालमत्ता कर बिल वाचून कळत नाही, त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. खरं तर ही करदात्या नागरीकांची मूलभूत गरज आहे, पण दुर्दैवाने नागरीकांनाच काय पण महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा नुसते बिल पाहून सदरहू बिलात ४०% सवलत दिली गेली आहे की नाही हे समजत नाही , त्यासाठी त्यांनाही मनपा संगणक प्रणालीमध्ये शोधावे लागते. (PMC Property Tax Bill)

या पार्श्वभूमीवर आम्ही २६ मार्च २०२५ ला आपल्याला पत्र लिहून यंदापासून तरी या मिळकतकर बिलावर त्या बिलात ४०% सवलत दिली गेली आहे की नाही हे ठळकपणे छापावे. जेणेकरून करदात्या नागरीकांमधील या संबंधीचा संभ्रम संपुष्टात येईल असे कळवले होते. महापालिका आयुक्तांनी  ही मागणी मान्य करुन ४०% सवलती बाबत बिलावर स्पष्ट उल्लेख छापण्यात येईल असे माध्यमांना सांगितले होते. मात्र यंदा बिले एक महिना उशीरा पाठवूनही ४०% सवलती बाबत बिलावर स्पष्ट उल्लेख छापण्यात महापालिकेला अपयश आले आहे. खरं तर ही माहिती महापालिकेच्या संगणकीय प्रणाली मध्ये आहे , तिथून ती बिलावर छापण्यात काहीही राॅकेट सायन्स नाही , मात्र तरीही हे होऊ शकले नाही हे अनाकलनीय आणि संतापजनक आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: