Pune Property Tax | ‘अभय’ चे लाभार्थी पुन्हा ‘थकबाकीदार’ | या लाभार्थ्यांना भविष्यात योजनेचा फायदा न देण्याची मागणी 

Homeadministrative

Pune Property Tax | ‘अभय’ चे लाभार्थी पुन्हा ‘थकबाकीदार’ | या लाभार्थ्यांना भविष्यात योजनेचा फायदा न देण्याची मागणी 

Ganesh Kumar Mule Jan 24, 2025 10:00 PM

PMC Property Tax Department | नागरिकांनो तुम्ही देखील करू शकता अनधिकृत प्रॉपर्टी ची पुणे मनपा कडे तक्रार
Assistant Municipal Commissioner PMC Property Tax | प्रशासन अधिकारी सुनिल मते यांच्याकडे सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार! 
PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागात काम करण्याचा मोह सुटेना | 5-6 वर्ष खात्यात काम करूनही पुन्हा टॅक्स विभागात येण्याची आस

Pune Property Tax | ‘अभय’ चे लाभार्थी पुन्हा ‘थकबाकीदार’ | या लाभार्थ्यांना भविष्यात योजनेचा फायदा न देण्याची मागणी

 

PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – चार वर्षांपूर्वी मिळकतकर अभय योजनेचा फायदा घेतलेल्यांपैकी निम्मे मालमत्ताधारक पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे त्यांची वसूली तातडीने करावी व भविष्यात कधीही त्यांना कोणत्याही अभय योजनेचा फायदा देण्यात येऊ नये. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे  आहे.  (Pune Municipal Corporation – PMC)

वेलणकर यांच्या निवेदनानुसार मिळकत कराची  थकबाकी वसूल व्हावी म्हणून पुणे महापालिकेने २०२०-२१ मध्ये अभय योजना आणली होती , या योजनेचा १,४९,६८३ थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला व कर भरला , मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे २१० कोटी रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेने लगेचच २०२१-२२ मध्ये पुन्हा एकदा मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून अभय योजना आणली होती , या योजनेचा ६६४५४ थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला व कर भरला , मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आम्ही त्यावेळीही या योजनांमुळे दरवर्षी प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरीकांवर याचा परीणाम होतो अशी भिती व्यक्त केली होती आणि थकबाकीदार सोकावतील आणि नवीन अभय योजना येईपर्यंत कर भरणार नाहीत असेही लिहिले होते. दुर्दैवाने आमची भिती खरी ठरली. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे माहिती अधिकारात मी माहिती मागितली की या अभय योजनांचा फायदा घेतलेल्यांपैकी किती मालमत्ता धारक ३१/१२/२०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत व त्यांनी कर भरलेला नाही. आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. २०२०-२१ मध्ये ज्या १४९६८३ थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी ६३५१८ (४२%) मालमत्ता धारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले. तर‌२०२१-२२ मध्ये ज्या६६४५४ थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी ४४६८५ ( ६७%) मालमत्ता धारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. असे वेलणकर यांनी सांगितले.
—–

अभय योजनेचा फायदा घेतल्यानंतरही जे लाखभर‌ मालमत्ताधारक पुन्हा एकदा ३१/१२/२०२४ अखेर थकबाकीदार झाले आहेत, त्यांची वसूली तातडीने करावी व भविष्यात कधीही त्यांना कोणत्याही अभय योजनेचा फायदा देण्यात येऊ नये.

–  विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच , पुणे