Pune Proprety Tax | अभय योजनेतून आतापर्यंत २३३ कोटी | चालू आर्थिक वर्षात विभागाने २००० कोटींचा टप्पा केला पार!
PMC Property Tax Department – (The Karbhari News Service) – कर आकरणी व करसंकलन विभागाचा सन २०२५-२६ मध्ये २००० कोटींचा टप्पा पार झाला आहे. ९.६७ लक्ष इतक्या मिळकतधारकांनी २००६ कोटी इतका मिळकत कर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे. तर अभय योजना कालावधीत आज अखेर ४२,४१३ मिळकतधारकांनी २२३.२६ कोटी इतका मिळकतकर जमा केला आहे. अशी माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली. (Pune Property tax News)
पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन केलेले आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतील एकूण मिळकतींची संख्या १४.९० लक्ष इतकी आहे. १ एप्रिल पासून ते आज अखेर पर्यंत ९.६७ लक्ष इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु.२००६.०५ कोटी इतका मिळकत कर पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेला आहे. यामध्ये १.०६ लक्ष (११.०२%) इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु.५९५.१० कोटी इतकी रक्कम धनादेशाद्वारे जमा केलेली आहे. तर २.०१ लक्ष (२०.८६%) इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. २२९.८० कोटी इतकी रोख रक्कम स्वरूपात जमा केलेली आहे. तसेच सर्वाधिक ६.५९ लक्ष (६८.१२%) इतक्या नागरिकांकडून online / digital प्रणालीद्वारे रक्कम रु ११८१.०१ कोटी जमा करण्यात आले आहे.
तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२५ पासून अभय योजना लागू करण्यात आली आहे. अभय योजना कालावधीत आज अखेर ४२,४१३ मिळकतधारकांनी २२३.२६ कोटी इतका मिळकतकर जमा केला आहे.
१५ जानेवारी २०२६ अखेर अभय योजना कालावधीत शास्ती रकमेवर ७५% सवलत देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेचे सर्व CFC (नागरी सुविधा केंद्र) सर्व दिवस (सुट्टीच्या दिवशी देखील) सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत सुरु राहणार असून नागरी सुविधा केंद्रावर गर्दी होणार नाही, फार काळ थांबावे लागणार नाही याकरिता जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाईन पध्दतीने कर भरावा. असे आवाहन उपायुक्त रवी पवार यांनी केले आहे.

COMMENTS