Pune Potholes | पुणे दरवर्षी खड्ड्यात का जाते?

HomeपुणेBreaking News

Pune Potholes | पुणे दरवर्षी खड्ड्यात का जाते?

Ganesh Kumar Mule Jul 01, 2023 11:05 AM

Pune Municipal Corporation (PMC): The custodian of Pune’s heritage and the architect of Pune’s promising future!
Dr. Siddharth Dhende | नागपूर चाळ, फुलेनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी
Draft DP of 11 villages | PMC Pune | समाविष्ट 11 गावांचा प्रारूप विकास आराखड प्रसिद्ध करण्यासाठी 1 मार्च पर्यंत मुदतवाढ! | शहर सुधारणा समितीची मान्यता

Pune Potholes | पुणे दरवर्षी खड्ड्यात का जाते?

| सजग नागरीक मंच मासिक चर्चासत्र

Pune Potholes | दरवर्षीच्या पावसाळ्यात (Monsoon) पुण्यातील रस्त्यावर खड्डे (Pune Potholes) पडतात. विशेष म्हणजे पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) रस्त्याच्या कामासाठी करोडो रुपये खर्च करते. असे असूनही पुणेकरांना दरवर्षी याचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे सजग नागरिक मंचाच्या (Sajag Nagrik Manch) वतीने पुणे दरवर्षी खड्ड्यात का जाते? या मासिक चर्चासत्र (Monthly Seminar) चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशांत इनामदार (Prashant Inamdar) व विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांचा सहभाग असणार आहे. सजग नागरिक मंचाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. (Pune Potholes)
याबाबत विवेक वेलणकर यांनी सांगितले कि, पाऊस सुरु होऊन जेमतेम आठवडा झाला आहे आणि पुण्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्तोरस्ती पाण्याची तळी दिसू लागली आहेत. रस्त्याची उखडलेली खडी सगळीकडे पसरल्याने वाहनचालक हैराण आहेत. एकीकडे दरवर्षी पुणे महापालिका रस्ते दुरुस्ती व रस्ते बांधणी तसेच स्टाॅर्म वाॅटर ड्रेनेज बांधकामासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करते. तर दुसरीकडे नागरीकांना खड्डेमय रस्त्यावर जीव मुठीत धरून जावे लागते आहे. (PMC Pune Road Department)
हे लक्षात घेऊन सजग नागरिक मंचाच्या मासिक सभेत या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये प्रशांत इनामदार व विवेक वेलणकर सहभागी होणार आहेत. (Pune News)
हे चर्चासत्र रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता, IMDR ( BMCC Road) येथे  आयोजित केले असून ते विनामूल्य सर्वांसाठी खुले आहे. असे विवेक वेलणकर  आणि  जुगल राठी यांनी कळविले आहे.
—-
News Title | Pune Potholes |  Why does Pune go to pit every year? |  Conscious Citizen Forum Monthly Seminar