Pune PMC Property Tax | प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट!

HomeपुणेBreaking News

Pune PMC Property Tax | प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट!

Ganesh Kumar Mule Aug 29, 2023 5:51 AM

PMC Pune Property Tax |  Pune Municipal Corporation will advertise on property tax discounts and bills through FM radio
PMC Property Tax Department | नागरिकांनो तुम्ही देखील करू शकता अनधिकृत प्रॉपर्टी ची पुणे मनपा कडे तक्रार
Pune Property Tax | पुणे महानगरपालिकेत थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करावा | राज्यमंत्री माधुरी मिसाळ | आरोग्य विभागातील एकवट मानधनावरील 168 सेवकांना कायम करा

Pune PMC Property Tax | प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट!

| मिळकत कर विभागाकडून वसुलीवर जोर

Pune PMC Property Tax |  पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून (PMC Property tax Department) कर वसुलीवर जोर देण्यात आला आहे. विविध कारणामुळे पुणेकर टॅक्स भरण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे वसुली करण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून विभाग प्रमुखांनी खात्यातील विभागीय पेठ निरीक्षकांना (DI) आणि पेठ निरीक्षक (SI)  प्रत्येक दिवशी 1 म्हणजे किमान 30 व्यावसायिक मिळकती (Commercial Properties) सील करण्याचे उद्दिष्ट्य दिले आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाकडून देण्यात आली. (Pune PMC Property Tax)

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1300 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. या नागरिकांना अपेक्षित आहे कि महापालिका अभय योजना राबवेल. मात्र प्रशासनाची अशी कुठलीही भूमिका सध्या दिसून येत नाही. (PMC Pune Property tax Department)

विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. नागरिक टॅक्स करण्याबाबत उदासीन दिसताहेत. तसेच काही ठिकाणी कोर्ट केसेस असल्याने अडचणी येत आहेत. तरीही दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे काही काळाने का होईना उत्पन्न वाढेल, असा विभागाला विश्वास आहे. (Pune Property tax)

विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी

दरम्यान वसुली करण्यासाठी विभागाला मागील वर्षाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वसुलीत अडचणी येत आहेत. कारण एखादी मिळकत सील करताना किमान 5 कर्मचारी लागतात. मात्र कर्मचारी अपुरे आहेत. तसेच कधी कधी नागरिक देखील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. जवळपास 100- 150 कर्मचारी कमी असल्याने विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे याची मागणी करण्यात आली. मात्र सामान्य प्रशासन विभागाने याबाबत उदासीन भूमिका घेतलेली दिसून येत आहे.
—–
News Title | Pune PMC Property Tax |  Aim to seal at least 30 commercial properties each day!