Pune PMC Officers | संदीप खलाटे यांचे पुनर्वसन; तर एका प्रशासन अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा!   | महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने कर्मचारी वर्गाला दिलासा

Homeadministrative

Pune PMC Officers | संदीप खलाटे यांचे पुनर्वसन; तर एका प्रशासन अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा! | महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने कर्मचारी वर्गाला दिलासा

Ganesh Kumar Mule Oct 05, 2024 3:36 PM

PMC Sky Sign Department |  Mumbai Hoarding Collapse | PMC Commissioner’s order to take action on unauthorized advertisement boards
Pune Municipal Corporation (PMC) – पावसाळा दरम्यानच्या कामात तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्यात समन्वय महत्वाचा | महापालिका आयुक्तांनी काय दिले आदेश?
Dr Rajendra Bhosale IAS | आपण सनदी नोकर आहात महापालिकेचे मालक नाही | महापालिका आयुक्तांवर विवेक वेलणकर कडाडले!

Pune PMC Officers | संदीप खलाटे यांचे पुनर्वसन; तर एका प्रशासन अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा!

| महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने कर्मचारी वर्गाला दिलासा

 

 

PMC Officers Promotion – (The Karbhari News Service) – शहरात निर्माण झालेल्या पुरस्थितीला जबाबदार धरत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे (Sandip Khalate PMC) यांना महापालिका आयुक्तांनी निलंबित केले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी खलाटे यांना एक संधी देत त्यांचे पुनर्वसन केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलाटे यांची बदली करण्यात येऊन त्यांना येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

प्रशासन अधिकारी पदावर काम करणाऱ्या प्रकाश मोहिते यांना पदोन्नती देऊन त्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा देण्यात आला आहे. मोहिते यांच्या कामावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे काम करण्यास आव्हानात्मक अशा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान महापालिका आयुक्तांच्या या निर्णयामुळे प्रशासकीय केडर मधील कर्मचाऱ्यांना मात्र चांगला दिलासा मिळाला आहे. (Pune PMC News)

– खलाटे यांच्यावर येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी

महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकत्याच काही सहाय्यक आयुक्तांची पदस्थापना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही पदस्थापना करण्यात आली आहे. कारण या काळात प्रभारी पद देऊ नये, असे आदेश आहेत. त्यामुळे ही पदस्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून संदीप खलाटे यांचे पुनर्वसन केले असल्याचे मानले जात आहे. कारण महापालिका आयुक्त यांनी २५ जुलै रोजी सिंहगड रोड येथे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करणेसाठी समक्ष भेट दिली होती. त्यावेळी खलाटे यांनी केलेल्या कामामध्ये कर्तव्यपरायणता दिसून आलेली नाही. तसेच त्यांनी कामाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली नसून ही अशोभनीय गोष्ट केलेली आहे. कर्तव्य पार पाडताना खलाटे यांनी गुणवत्ता, औचित्य व उत्तरदायित्व ठेवले नसल्याचे निदर्शनास आले आहे. असा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र आयुक्तांनी खलाटे यांना न्याय देत काम करण्याची संधी दिली आहे.
खलाटे यांची बदली करण्यात येऊन त्यांना येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

– मोहिते यांना पदोन्नत्ती

प्रशासन अधिकाऱ्याची पात्रता असताना देखील आणि हक्काचे असताना देखील त्यांना सहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती दिली जात नाही, अशी ओरड प्रशासकीय केडर मधून होत असते. मात्र महापालिका आयुक्तांनी याबाबत देखील चांगला निर्णय घेतला आहे.
प्रशासन अधिकारी पदावर काम करणाऱ्या प्रकाश मोहिते यांना पदोन्नती देऊन त्यांना सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा देण्यात आला आहे. मोहिते यांच्या कामावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे काम करण्यास आव्हानात्मक अशा भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सेवानिवृती साठी अवघे काही महिनेच उरले असताना मोहिते देखील आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडून प्रशासकीय केडर वरील विश्वास वृद्धिंगत करतील, अशी आता अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान आयुक्तांनी राज्य सरकार कडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करुन त्यांना पदस्थापना दिली आहे. यामध्ये बाळासाहेब ढवळे पाटील यांच्याकडे शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, विजय नायकाल यांच्याकडे कोथरुड-बावधन, अमोल पवार यांच्याकडे वानवडी-रामटेकडी, हेमंत किरूळकर यांच्याकडे ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालय, तर सुरेखा भणगे यांच्याकडे कसबा-विश्रामबागवाडा या क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0