Pune PMC News | आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर देखील अभ्यागत कक्ष! | नागरिकांच्या तक्रारी निवारणात गती आणण्याचा प्रयत्न

Homeadministrative

Pune PMC News | आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर देखील अभ्यागत कक्ष! | नागरिकांच्या तक्रारी निवारणात गती आणण्याचा प्रयत्न

Ganesh Kumar Mule Sep 23, 2024 9:33 PM

Water Closure | शहराच्या काही भागात येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार
  Traffic in Mundhwa Chowk smooth!  | PMC Additional Commissioner Vikas Dhaknes Information
Ganesh immersion tanks | PMC Pune | गणराया महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना सदबुद्धी दे | विवेक वेलणकर

Pune PMC News | आता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर देखील अभ्यागत कक्ष! | नागरिकांच्या तक्रारी निवारणात गती आणण्याचा प्रयत्न

 

Pune Municipal Corporation – PMC – (The Karbhari News Service) – नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आयुक्त कार्यालयात (PMC Commissioner Office) अभ्यागत कक्ष निर्माण केला आहे. त्याच धर्तीवर आता क्षेत्रीय कार्यालय (PMC Ward Office) स्तरावर देखील अभ्यागत कक्ष निर्माण करण्यात येणार आहेत. त्यात विविध सदस्य असतील. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune)

अभ्यागतांच्या तक्रारींची, कामाची दखल घेऊन त्यांचे तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालय यांनी सोमवार व गुरुवार या दिवशी दु.०३:३० वा. ते सा.०५:३० वा. ही वेळ अभ्यागतांना  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुषंगाने, नागरिकांचे तक्रार निवारण करण्याकरिता महापालिका स्तरावर अभ्यांगतांसाठी  कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्यक क्षेत्रिय कार्यालयांतर्गत अभ्यांगत कक्ष स्थापन करण्यात येत आहे.

 कक्षामध्ये असे असतील अधिकारी/कर्मचारी

सहाय्यक आयुक्त – अध्यक्ष

उप अभियंता – सदस्य

कनिष्ठ अभियंता – सदस्य

१) मलनिःसारण व देखभाल दुरुस्ती विभाग
२) पथ विभाग
३) अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग
४) घनकचरा व व्यवस्थापन विभाग
५) विद्युत विभाग

वरिष्ठ लिपिक

लिपिक टंकलेखक

शिपाई

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0