Pune PMC News | स्वीकृत नगरसेवकांसाठी आवश्यक NOC साठी ऑनलाईन प्रणाली | १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार | १० स्वीकृत नगरसेवक असणार 

Homeadministrative

Pune PMC News | स्वीकृत नगरसेवकांसाठी आवश्यक NOC साठी ऑनलाईन प्रणाली | १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार | १० स्वीकृत नगरसेवक असणार 

Ganesh Kumar Mule Jan 30, 2026 6:55 PM

ISO Rating | PMC schools | महापालिकेच्या ८ शाळांना ISO मानांकन
MLA Sunil Kamble | पुणे कॅंटॉन्मेंट मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचार कार्यालयाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन 
Aadhaar | आधारमध्ये होणार मोठा बदल | बायोमेट्रिक्स दर 10 वर्षांनी अपडेट करता येणार

Pune PMC News | स्वीकृत नगरसेवकांसाठी आवश्यक NOC साठी ऑनलाईन प्रणाली | १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार | १० स्वीकृत नगरसेवक असणार

 

Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेची  सार्वत्रिक निवडणुक  १५ जानेवारी  रोजी पार पडली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार स्विकृत सदस्य निवड प्रक्रिया पार पडणार आहे. स्विकृत सदस्यांची निवड प्रक्रिया  महापौर आणि  उपमहापौर यांच्या निवडणूकीनंतर होणाऱ्या पहिल्या विशेष सभेनंतर पार पडणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

स्विकृत सदस्यांना आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत ऑनलाईन यंत्रणा अंमलात आणण्यात आली आहे. विहित कालमर्यादेत ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या करिता महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ २०२६ साठी थकबाकी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांसाठी लिंक : https://nocelection.pmc.gov.in/ उपलब्ध करून देण्यात आली होती. याच ऑनलाईन प्रणालीद्वारे स्विकृत सदस्य होणाऱ्या उमेदवारांनी नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करावयाचा आहे.

लिंक ३० जानेवारी  पासून १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करणे करिता उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही. असे उपायुक्त रवी पवार यांनी स्पष्ट केले आहे.

| १० स्वीकृत नगरसेवक असणार

दरम्यान नियमानुसार पुणे महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक येणार आहेत. सरकारच्या धोरणानुसार एका शहरात १० पेक्षा जास्त नसतील आणि एकूण नगरसेवकांच्या १०% यापैकी जे कमी असेल तेवढी स्वीकृत नगरसेवकांची संख्या असणार आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत १६५ नगरसेवकांसाठी १० स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. यामध्ये भाजपचे ७, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २ आणि कॉंग्रेस चा एक स्वीकृत नगरसेवक असणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: