Pune PMC News | नगरसचिव आणि क्रीडा अधिकारी पदावर नेमणुकी बाबतचे महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी
PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation – PMC) गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त असलेल्या नगरसचिव (PMC Municipal Secretary) पदावर अखेर अधिकारी मिळाला आहे. राजशिष्टाचार अधिकारी तथा उप नगरसचिव योगिता भोसले (Yogita Bhosale PMC) यांना नगरसचिव (पे मॅट्रिक्स- S- २३) या पदावर पदोन्नती दिली आहे. बढती समितीने त्यांची शिफारस केल्यानंतर एकाच दिवशी विधी समिती (PMC Law Committee) आणि मुख्य सभेने (PMC General Body Meeting) या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. दरम्यान मुख्य सभेने मान्यता देऊनही नेमणूक दिल्याचे आयुक्तांचे आदेश जारी झाले नव्हते. आज महापालिका आयुक्त यांनी हे आदेश जारी केले आहेत. तसेच क्रीडा अधिकारी पदावर शिवराज राक्षे आणि रेश्मा पुणेकर यांना देखील नेमणूक देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation Municipal Secretary)
क्रीडा अधिकारी पदाबाबत अन्याय झाल्याची भावना
सरकारने महापालिकेला आदेशित केले की, शिवराज राक्षे आणि रेश्मा पुणेकर या दोघांना क्रीडा अधिकारी (S- 15) या पदावर नियुक्ती द्यावी. मात्र याला कर्मचारी निवड समितीने हरकत घेतली होती. नियमानुसार असे करता येणार नाही, त्यामुळे याबाबत राज्य सरकारनचे मार्गदर्शन घ्यावे, अशी शिफारस समितीने केली होती. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही शिफारस लक्षात न घेता क्रीडा समिती आणि मुख्य सभेत या बाबतचा प्रस्ताव मान्य करून घेतला आहे. तसेच या दोघांच्या नेमणुकीचा आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केले आहेत.
मात्र यामुळे महापालिका कर्मचारीयांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. कारण महापालिकेत क्रीडा अधिकारी याची दोन पदे रिक्त आहेत. या पदाच्या आकृतीबंध नुसार यातील एक जागा ही सरळसेवा किंवा नामनिर्देशन ने भरणे बंधनकारक आहे. तर एक जागा ही पदोन्नती ने भरणे बंधनकारक आहे. असे असताना देखील या दोन्ही जागा नामनिर्देशन अनुसार भरण्याचा घाट घातला गेला.
COMMENTS