Pune PMC News | पुणे महापालिकेत साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेत साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन

Ganesh Kumar Mule Sep 27, 2024 8:14 PM

PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून शास्तीची कारवाई
PMC Retirement | उपायुक्त जयंत भोसेकर यांच्यासह महापालिकेचे ४३ कर्मचारी आणि अधिकरी सेवानिवृत्त!
PMC Labour Welfare Department | अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचारी विजय गेजगे यांच्या वारसाला २५ लाख | मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची माहिती

Pune PMC News | पुणे महापालिकेत साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन!

 

International Right to Information Day – (The Karbhari News Service) – २८ सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ रोजी कार्यलयीन सुट्टी असल्याने दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ रोजी पुणे महानगरपालिकेत “ आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन ” साजरा करण्यात आला. (Pune Municipal Corporation- PMC)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात १२ ऑक्टो २००६ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धीकरिता व प्रभावी अंमलबजावणी करिता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर “ माहिती अधिकार दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. प्रतिवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस ” माहिती अधिकार दिन ” म्हणून राज्यभर साजरा करण्यातयावा, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिना निमित्त पुणे महानगरपालिकेतील सर्व जनमाहिती अधिकारी यांना कामकाजात येणाऱ्या अडचणी व नागरिकांशी सुसंवाद साधुन माहिती अधिकाराची अधिकाधिक परिणामकारक अंमलबजावणी करणेकामी   नितीन केंजळे, माहिती अधिकार नोडल अधिकारी तथा मुख्य कामगार अधिकारी,व  राजीव नंदकर, उप आयुक्त (प्रशिक्षण प्रबोधिनी) यांचे मार्फत “ माहिती अधिकार अधिनियम, २००५” बाबत प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील २०० जनमाहिती अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0