PMC Financial Committee  | वित्तीय समितीमुळे शहराचे नुकसान झाले असेल तर समिती रद्द करू | महापालिका आयुक्त नवल किशोर राम 

Homeadministrative

PMC Financial Committee | वित्तीय समितीमुळे शहराचे नुकसान झाले असेल तर समिती रद्द करू | महापालिका आयुक्त नवल किशोर राम 

Ganesh Kumar Mule Feb 18, 2026 8:20 PM

Tipu Sultan | Pune BJP | टिपू सुलतान चे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही | धीरज घाटे
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका
Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

Pune PMC News | वित्तीय समितीने शहराचे नुकसान झाले असेल तर समिती रद्द करू | महापालिका आयुक्त नवल किशोर राम

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – वित्तीय समिती बरखास्त करण्याची मागणी नगरसेवकांनी आजच्या मुख्य सभेत केली. यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले कि, वित्तीय समितीमुळे शहराचे काही नुकसान झाले असेल तर समिती रद्द करायला हरकत नाही. समितीच्या कामाचा अहवाल पुढील सभेसमोर ठेवला जाईल. असे देखील आयुक्तांनी सांगितले. (PMC Pune News)
याबाबत आजच्या मुख्य सभेत  भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सुतार म्हणाले कि, प्रशासनाचा कल विकास कामे करण्यापेक्षा अडवण्याकडे जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने वित्तीय समिती, निविदा समिती अशा समित्या तयार केल्या आहेत.  अशा सगळ्या गोष्टी मुळे विकासावर परिणाम होतो आहे. त्यामुळे प्रशासनाने खुलासा करावा. अशी मागणी सुतार यांनी  केली. त्यानंतर धीरज घाटे म्हणाले कि, वित्तीय समिती कोविड काळात तयार करण्यात आली होती. सद्यस्थितीत समितीची आवश्यकता नसेल तर निर्णय करून बरखास्त करावी. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे नगरसेवक बाबुराव चांदेरे म्हणाले,  प्रशासक काळात वित्तीय समिती होती. मात्र आता स्थायी समिती आणि मुख्य सभा अशा दोनच कराव्यात. कॉंगेस नगरसेवक अरविंद शिंदे म्हणाले, स्थायी समिती असताना वित्तीय समितीची काय आवश्यकता आहे? हा स्थायी समितीला समांतर समिती करणे हा स्थायी समितीचा अपमान आहे.
यावर महापालिका आयुक्त  नवल किशोर राम यांनी खुलासा केला. आयुक्त म्हणाले, वित्तीय समिती बाबत मी स्वतः अभ्यास करून काही नुकसान झाले का यावर विचार करतो. स्थायी समितीत प्रशासनाचे डॉकेट जाते. वित्तीय समिती मुळे विकासकाम कशी करायचे ते कळते. त्यानुसार आम्हाला काम करण्याची दिशा मिळते. मात्र समितीमुळे शहराचे नुकसान होत असेल तर समिती बरखास्त करू. समिती असण्याचा आम्ही आग्रह धरत नाही. शहराचे नुकसान होत असेल तर समिती रद्द करायला हरकत नाही. याबाबत आम्ही पुढील मुख्य सभेत समितीने केलेल्या कामाचा अहवाल देतो.
——–
प्रशासनाचा कल विकास कामे करण्यापेक्षा अडवण्याकडे जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने वित्तीय समिती, निविदा समिती अशा समित्या तयार केल्या आहेत.
| पृथ्वीराज सुतार, नगरसेवक, भाजप. 
——
समितीमुळे शहराचे नुकसान होत असेल तर समिती बरखास्त करू. समिती असण्याचा आम्ही आग्रह धरत नाही.
| नवल किशोर राम, महापालिका आयुक्त. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: