Pune PMC News | हडपसर मधील  धोबी घाट, शहीद सौरभ फराटे स्मारक विकसित करून स्व. हेमंत करकरे उद्यान वाचविण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Homeadministrative

Pune PMC News | हडपसर मधील  धोबी घाट, शहीद सौरभ फराटे स्मारक विकसित करून स्व. हेमंत करकरे उद्यान वाचविण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Mar 25, 2025 12:21 PM

Devendra Fadnavis | कसब्यातील लोकांचा आशिर्वाद मागण्यासाठी पुन्हा येऊ ..! असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
PMC Commissioner | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दहा ठेकेदारांना  दिले अभय
PMRDA receives Rs. 410 cr from Centra Government for the Pune Metro Line

Pune PMC News | हडपसर मधील  धोबी घाट, शहीद सौरभ फराटे स्मारक विकसित करून स्व. हेमंत करकरे उद्यान वाचविण्याची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

 

Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – हडपसर (Hadapsar) मधील स्व. हेमंत करकरे उद्यान (Hemant Karkare Garden) या जागी भेट देऊन पाहणी करावी व सर्व्हे नं. १५ मधील आरक्षण सव्र्व्हे नं. १६ मध्ये हेमंत करकरे उद्यानात स्थलांतरित न करता, सर्व्हे नं. १५ मधील मॅटर्निटी होमची जागा कायदेशीर मार्गाने ताब्यात घ्यावी. तसेच सर्व्हे नं. १६ मधील जागेची रक्कम पाटबंधारे विभागास अदा केल्याने शहीद हेमंत करकरे उद्यान, धोबी घाट, शहीद सौरभ फराटे स्मारक तात्काळ विकसित करावे. अन्यथा, स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) व पुणे शहर काँग्रेसचे प्रशांत सुरसे (Prashant Surse Pune Congress) यांचे नेतृत्वखाली शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांना दिला.

पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्‌यानुसार हडपसर येथील सर्व्हे नं. १५ व सव्र्व्हे नं. १६ मध्ये मॅटर्निटी होम (MH 31) साठी १५०२.०० चौ. मी. जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. तसेच सर्व्हे नं. १६ मध्ये धोबी घाट (DJ 11) साठी ५०० चौ. मी. जागा आरक्षित केली आहे. याप्रमाणे, सर्व्हे नं. १६ मध्ये शहीद सौरभ फराटे स्मारकाच्या विकासासाठी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे, जो दि. १९ जुलै २०१८ रोजी सर्वसाधारण सभेत सभा क्रमांक ३२, विषय क्रमांक ७३९, व ठराव क्रमांक २०९ नुसार एकमताने मंजूर करण्यात आला होता. तसेच सर्व्हे नं. १५ व १६ मधील जागांवर पाटबंधारे विभाग व पुणे महानगरपालिकेने वृक्षारोपणासाठी केलेला करारानुसार शहीद हेमंत करकरे उद्यान विकसित केले आहे. तसेच, या जागेवर मोठा उजवा कालव्याच्या उत्तरेकडील जागेवर उद्यान आरक्षित असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.

या सर्व जागांचा संबंध पाटबंधारे विभागाशी असून, आरक्षण निहाय विकास व विनियोगासाठी पुणे महानगरपालिकेने अनेक वेळा पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. विकास आराखड्यानुसार, मॅटर्निटी होम (चक ३१) साठी सव्र्व्हे नं. १५ व १६ मध्ये अनुक्रमे ७५१.०० चौ. मी. जागा असे एकूण १५०२.०० चौ. मी. आरक्षित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागांकडून दिनांक २१/८/२०१९ रोजी पत्र प्राप्त केले होते, त्यानुसार या जागेचे मूल्य ३,२५,१८,३०० रुपये दि. २८/०८/२०१९ रोजी डिमांड ड्राफ्ट काढून रक्कम संबंधित विभागाला अदा केलेली आहे. तथापि, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत ३१/१/१८ रोजी झालेल्या ठरावानुसार सव्र्व्हे नं. १६ चा उल्लेख आहे, परंतु सव्र्व्हे नं. १५ चा उल्लेख कॅनॉलसाठी संपादित जागेवर ७/१२ अमल नसल्यामुळे दिसून येत नाही. यामुळे पुणे महानगरपालिका संबंधित जागा ताब्यात घेण्यास अडचणींचा सामना करत आहे. पाटबंधारे विभागाकडून सर्व्हे नं. १५ चा उल्लेख करण्याची प्रक्रिया सुरू असून, तसेच पुणे मनपाकडून अनेक वेळा पत्र व्यवहार झाल्याचे सुद्धा माहिती अधिकारात दिसून येते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक १३/८/२०२० रोजी शासकीय मोजणी देखील करण्यात आलेली आहे.

परंतु अलीकडेच उजव्या कॅनॉल शेजारील अनेक वर्षे पाटबंधारे खात्याच्या या जागेवर अचानकपणे पुण्यातील प्रसिद्ध खाजगी बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या मालकीचे फलक लावले असून, स्वतःच्या ताब्यात असल्याचे दर्शवले आहे. यानंतर या परिसरातील माजी नगरसेवकाच्या हट्टामुळे आणि मनपा अधिकाऱ्यांच्या साठे लोट्यामुळे, सर्व्हे नं. १५ मधील आरक्षण सर्व्हे नं. १६ मधील हेमंत करकरे उद्यानात स्थलांतरित करण्याची प्रक्रिया घाईघाईने सुरू करण्यात आली आहे.
यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खरे तर एवढे दिवस पुणे मनपाच्या केलेल्या कार्यवाही नुसार कागदपत्रा नुसार ही जागा पाटबंधारे विभागाची होती. तसेच या मॅटर्निटी होम च्या जागेसाठी पुणे मनपाने ३ कोटी २५ लाख १८ हजार ३०० रुपये एवढी मोठी रक्कम सर्व्हे नं. १५ व १६ मधील आरक्षणासाठी पाटबंधारे विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळास डिमांड ड्राफ्ट द्वारे अदा करूनही अचानक या सर्वे नंबर मधील ही जागा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिकाच्या ताब्यात गेल्याने संशयास्पद व्यवहार दिसून येतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यात आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत असून, पुणे मनपा प्रशासनाने दाखवलेल्या हलगर्जीपणाबाबत साशंकता निर्माण होते.

पुण्यातील प्रसिद्ध खाजगी बांधकाम व्यवसायिकाच्या व स्वतःच्या फायद्यासाठी माजी नगरसेवकाच्या हट्टापोटी, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वरिष्ठ नेते व वरिष्ठ अधिकारी यांना धोबी घाट आणि शहीद सौरभ फराटे स्मारकाच्या बाबत अंधारात ठेवून सर्व्हे नं. १५ मधील आरक्षण स्थलांतरित करण्याचा उद्योग सुरू केला. यामुळे शहीद हेमंत करकरे उद्यान अडचणीत आणले गेले.

 

यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पल्लवी सुरसे, नंदकुमार अजोतीकर, हडपसर धोबी घाट संघटनेचे अध्यक्ष सतीश शिंदे मंगेश राऊत वृषभ रणदिवे विरनाथ सरडे, गणेश जगताप आदि.पदाधिकारी उपस्थित होते.

खरंतर सातववाडी, गोंधळे नगर, १५ नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, गंगानगर या परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, युवक व लहान मुलांना व्यायामासाठी व खेळण्यासाठी तसेच मोकळा श्वास घेण्याचे एकमेव ठिकाण आहे. आरक्षण स्थलांतरित झाल्यास या उद्यानाचा श्वास कोंडला जाईल यामुळे या परिसरातील नागरिकांची विशेषता जेष्ठ नागरिकांची फार मोठी गैरसोय होईल. आत्ताच्या ग्लोबल वार्मिंग च्या काळामध्ये उद्यानामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणे हे चिंताजनक आहे वाढती उष्णता व वाढते तापमान पाहता उद्याने टिकली व वाढली पाहिजेत झाडे टिकली पाहिजे असे धोरण महानगरपालिकेच्या असताना उद्यानामध्येच आरक्षण स्थलांतरित करण्याचा प्रयत्न का केला जातो? हा नागरिकांसमोर फार मोठा प्रश्न आहे.

महानगरपालिका प्रशासनाने सन २०१९ मध्ये ३ कोटी २५ लाख १८ हजार रुपयांचा धनादेश पाटबंधारे विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नावावर डिमांड ड्राफ्टाद्वारे अदा केला, परंतु त्यामध्ये सर्व्हे नं. १५ चा उल्लेख होत नाही, अचानकपणे खाजगी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक सर्व्हे नं. १५ जागेवर स्वतःची मालकी असल्याचे फलक लावतो तसेच त्याच ठिकाणी असलेले आरक्षण स्थलांतरित करण्याची प्रक्रिया घाईघाईने सुरू करण्यात येते. जर सर्व्हे नं. १५ चा उल्लेख नाही तर मनपा कडून ऐवढी मोठी रक्कम पाठबंधारे विभागास कशी काय अदा केली जाते? हे सर्व संशयास्पद आहे, आणि यामध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा संशय निर्माण होतो. याप्रकरणा बाबत उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे.

महानगरपालिकेच्या कार्यालयात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अप्पर आयुक्त महेश पाटील, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उद्यान युवा प्रमुख अशोक घोरपडे आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशांत सुरसे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे गंभीरपणे ऐकून तात्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. भोसले यांनी दिले.

 

प्रशांत सुरसे यांनी सांगितले की, “हेमंत करकरे उद्यान आणि शहीद सौरभ फराटे स्मारकाच्या आरक्षणांबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे. यासाठी, संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयांवर विचारपूर्वक पुनरावलोकन आवश्यक आहे. काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे जर हेमंत करकरे उद्यानाचा श्वास कोंडला जात असेल, तर आमच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.”

निवेदनकर्त्यांची मागणी:

१. हेमंत करकरे उद्यान व शहीद सौरभ फराटे स्मारकाच्या जागेवर कोणतेही आरक्षण स्थानांतरण होऊ नये. या जागेचा पुरेसा वापर उद्यानासाठी व्हावा आणि हे उद्यान आसपासच्या क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी आणि मुलांसाठी श्वास आहे यासाठी ही जागा महत्त्वाची आहे

२. मॅटर्निटी होम साठी सर्वे नंबर 15 मधील जागा कायदेशीर मार्गाने ताब्यात घ्यावी.

३.सर्व्हे नं. १५ व १६ मधील जागांवर आरक्षणाची प्रक्रिया तात्काळ बदलली जाऊ नये. या जागेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जावी.

४.पुणे महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाशी केली असलेली ३ कोटी २५ लाख १८ हजार ३०० रुपये रक्कम संबंधित विभागाला अदा केल्यास, त्या जागेची कायदेशीर स्थिती स्पष्ट केली जावी.

५. शहीद हेमंत करकरे उद्यान, धोबी घाट आणि शहीद सौरभ फराटे स्मारकाचे तात्काळ विकास कार्य सुरू करणे.

६. या प्रकरणातील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करणे.