Pune PMC News – ३५ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेला दिली भेट
Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) मार्फत यूपीएससी उत्तीर्ण अधिकारी यांच्यासाठी विशेष फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत आज ३५ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मा. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी सर्वांचे स्वागत करीत त्यांना महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती दिली.
COMMENTS