Pune PMC Helmet News | कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांना देखील हेल्मेट सक्तीचे केल्याने पुणे महापालिकेत उद्भवले वादाचे प्रसंग!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र याची अंमलबजावणी करताना नागरिकांना देखील हेल्मेट ची सक्ती केली गेली. त्यामुळे नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण झाले. नागरिकांना सक्ती करून प्रशासनाला काय साध्य करायचे होते, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) दुचाकीचा वापर करणारे सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सूचित करण्यात आले आहे की, दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करणे प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांचे कर्तव्य आहे. जे अधिकारी/कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत अशा अधिकारी/कर्मचारी यांच्यावर म.ना.से. (शिस्त व अपिल) कलम ३ (१) मधील पोट नियम (१८) पोट नियम (१९) च्या अंतर्गत शिस्तभंगाविषयी कारवाई (दंड व मुळ सेवापुस्तकात नोंद) संबंधित कार्यालय प्रमुखांनी करावयाची आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation- PMC)
पुणे विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून याचे पालन सर्व संबधितांनी करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतेच दिले होते.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश जारी केले होते. याच्या अमलबजावणी चे अधिकार सुरक्षा विभागाला दिले होते. मात्र सक्ती करताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी नागरिकांना देखील महापालिका भवनात सोडले नाही. नागरिकांना या नियमाची कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे नागरिक गोंधळून गेले. यामुळे काही नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वाद देखील झाले. नागरिक मागणी करत होते कि, कर्मचाऱ्यां कडे याबाबत काही लेखी आदेश आहेत का, मात्र असे आदेश फक्त कर्मचाऱ्या पुरते मर्यादित असल्याने सुरक्षा कर्मचारी नागरिकांना असे लेखी आदेश दाखवू शकले नाहीत. यामुळे कर्मचारी देखील हतबल झालेले दिसले. त्यामुळे प्रशासनाला याबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे.
दरम्यान दुसरीकडे काहीच कर्मचारी हे हेल्मेट घालून आलेले दिसले. त्यामुळे पालिका भवनातील पार्किंग रिकाम्या दिसून आल्या. तसेच काही कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या बाहेर गाड्या लावल्या होत्या. त्यामुळे गावठाण परिसरात आणि पालिका परिसरात ट्राफिक पाहायला मिळाले. यावर प्रशासन कसा आळा घालणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
COMMENTS