Pune PMC DA Hike Circular | मनपा कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याबा बतचे परिपत्रक जारी
| फरकासह महागाई भत्ता मे पेड इन जून च्या वेतनातून दिला जाणार
Pune PMC DA Hike Circular | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Pune Employees) केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत् ता (Dearness Allowance) अदा करण्यात येतो. 1 जानेवारी पासून महागाई भत्ता 4% ने वाढवून तो 42% इतका करण्यात आला आहे. त्यानुसार मनपा कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. याला आयुक्तांनीही मंजूरी दिली आहे. याबाबतचे परिपत्रक येणे बाकी होते. मुख्य वित्त व लेखा विभागाकडून हे परिपत्रक (Circular) जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 5 महिन्याच्या फरकाचा लाभ कर्मचाऱ्यांना मे पेड इन जून (May paid In June Salary) च्या वेतनात मिळेल. असे महापालिका प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. (Pune PMC DA Hike Circular)
: असे आहे परिपत्रक
पुणे महानगरपालिका अधिकारी/सेवकांना दिनांक ०१.११.१९७७ पासून मे. केंद्र शासनाचे सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देण्यास तसेच त्या मध्ये वेळोवेळी होणारे बदल जसेच्या तसे लागू करण्यास मनपा सभा ठ.क्र. ३७२ दिनांक २३.१२.१९७७ ने धोरणात्मक मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
सद्यस्थितीत दिनांक ०१/०७/२०२२ पासुन ३८% दराने महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या ज्ञापनानुसार महागाई भत्त्याचा दर दिनांक ०१/०१/२०२३ पासुन ३८% वरून ४% ने बाढवून ४२ % इतका करण्यात आलेला आहे. पुणे महानगरपालिकेतील अधिकारी / सेवकांना व सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुंटूंबनिवृत्ती वेतनधारक यांना दिनांक ०१/०१/२०२३ पासुन ३८% वरून ४% दराने महागाई भत्ता वाढवुन म्हणजेच एकुण ४२% दराने महागाई भत्ता फरकासह आदा करणेस महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे. (PMC Pune news)
१. माहे जानेवारी २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३८% वरून ४२%) या दराने अदा करणेस
२. माहे जानेवारी २०२३ ते एप्रिल २०२३ या चार माहिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३८% वरून ४२%) फरक माहे मे २०२३ पेड इन जुन २०२३ चे वेतनातून अदा करणेस
३. सेवानिवृत्ती अधिकारी / कर्मचारी सेवकांना व कुंटूंबनिवृत्ती वेतनधारकाना माहे जानेवारी २०२३ ते माहे में २०२३ या पाच माहिन्याचे ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सुधारित दराने (३८% वरून ४२% ) फरक माहे जुन २०२३ पेड इन जुलै २०२३ चे निवृत्ती वेतनात अदा करणेस.
यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
—-
Pune PMC DA Hike Circular | Circular issued regarding payment of Dearness Allowance to PMC Pune employees at revised rates