Pune PMC Commissioner | ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम | सर्वोत्तम महापालिका आयुक्तामध्ये पुणे महापालिका आयुक्त दुसऱ्या स्थानावर!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आले आहे. त्यात सर्वोत्तम महापालिका आयुक्त या श्रेणीत पुणे महापालिका आयुक्त दुसऱ्या स्थानावर आले आहेत. तर पहिल्या स्थानावर पनवेल महापालिका आयुक्त हे आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, AI व Blockchain चा शासकीय कामकाजात वापर आणि GIS चा कामात वापर अशा ७ सर्वंकष मुद्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहे.
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन सरकार कडून करण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचा लवकरच राज्य शासनातर्फे गौरव करण्यात येईल. असे सरकार कडून सांगण्यात आले आहे.
सर्वोत्तम महापालिका आयुक्त या श्रेणीत एकूण २९ महापालिकांचे आयुक्त स्पर्धेत होते. त्यात पुणे महापालिका आयुक्त यांना १८६.२५ इतके गुण मिळाले आहेत. ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पहिला क्रमांक पटकावलेल्या पनवेल महापालिका आयुक्त यांना १८७.७५ इतके गुण मिळाले आहेत.
| सर्वोत्तम शासकीय संस्थामध्ये पीएमआरडीए तिसऱ्या स्थानावर
तसेच या स्पर्धेत सर्वोत्तम शासकीय संस्था/ मंडळे व कंपन्या याचा समावेश होता. त्यात एकूण ९७ शासकीय कार्यालये होती. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तिसऱ्या स्थानावर आहे. PMRDA ने १८८.५० इतके गुण मिळाले आहेत.

COMMENTS