Pune PMC Action on Illegal Construction | FC रोड वरील शॉपिंग मॉल वर कारवाईचा दणका 

HomeपुणेBreaking News

Pune PMC Action on Illegal Construction | FC रोड वरील शॉपिंग मॉल वर कारवाईचा दणका 

गणेश मुळे Jun 11, 2024 3:19 PM

PMC Action Against Pubs | मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर FC रोड वर कारवाईचा बुलडोझर! 
Action by PMC on 11 unauthorized buildings near Sinhagad College in Ambegaon
PMC Action against Pub and Bar | पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील 40 हॉटेल, रेस्टॉरंट वर कारवाई! 

Pune PMC Action on Illegal Construction | FC रोड वरील शॉपिंग मॉल वर कारवाईचा दणका

Pune Municipal Corporation Building Devlopment Department | FC रोड वर बांधकाम विकास विभागाचे वतीने जोरदार कारवाई करण्यात आली. शिरोळे प्लॉट येथील विनापरवाना शॉपिंग मॉल वर ही कारवाई करण्यात आली.

सदर ठिकाणी लोखंडी एंगल, गर्डर, पत्रे इ. चे सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. या मध्ये छोटी मोठी मिळून 70 स्टॉल वजा दुकाने चालू होती. या कारवाईस मे. न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले होते. यामुळे कारवाई करता येत नव्हती. प्रशासनाने मोठे वकील देवून आठ वर्ष चाललेला स्थगिती आदेश उठवून घेतला. लगेच मे. उच्च न्यायालया मध्ये कॅवेट दाखल केले. आणि तातडीने 4 December 23 रोजी कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे 7000 चौरस फुट बांधकाम पाडण्यात आले.

तथापि 4.30 वा. मे उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यामुळे कारवाई थांबवण्यात आली. मात्र आता स्थगिती आदेश उठल्या मुळे आज कारवाई करण्यात आली. आज सुमारे 5000 चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.
या मॉल मुळे F C रोड वर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉल मध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आणि मॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असल्याने आगी सारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली असती.

एक jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. मॉल मध्ये कपड्यांची दुकाने असल्याने आग लागण्याची शक्यता होती. यामुळे अग्नीशमन ची एक गाडी तयार ठेवण्यात आली होती. शिवाजी नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे  व ईतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

कारवाई अधीक्षक अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे शाखा अभियंता, यांनी पूर्ण केली