Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  

Homeadministrative

Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य  

Ganesh Kumar Mule Oct 15, 2024 7:28 PM

Budget | Maharashtra | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस
Job Seekers | पाचवी पासून ते बीटेक पर्यंतच्या उमेदवारांना नोकरीची संधी | जाणून घ्या सविस्तर 
PMC Pune Polio Vaccine Schedule | पुणे महापालिका कार्यक्षेत्रात पोलिओ लसीकरण मोहीम 9 मार्च पर्यंत चालणार 

Pune PMC 32 Villages Committee | समाविष्ट 32 गावांच्या लोकप्रतिनिधींच्या समितीत अजून तीन सदस्य  | जाणून घ्या नवीन सदस्य

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली होती. दरम्यान सरकारने यात अजून तीन सदस्य वाढवले आहेत. नुकतेच सरकारने याबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी पाठपुरावा केला होता. (Pune PMC News)

पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 32 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. (PMC Pune village news)

आता या समाविष्ट ३४ गावांतील मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामे या समितीद्वारे केली जातील. यामुळे 32 गावांचा खोळंबलेला विकास मार्गी लागण्याची शक्यता आहे. १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यासंबंधीचे आदेश नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी (Priyanka Kulkarni) यांनी जारी केले होते. २०१७ मध्ये ११ तसेच २०२१ मध्ये २३ अशा एकूण ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला. मात्र, या समावेशानंतर ताबडतोब म्हणजेच मार्च २०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर महापालिका निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वाधिक फटका या  गावांना बसत आहे.या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्यांची महापालिकेनुसार त्यांची प्रभाग रचना आणि अन्य गोष्टी वादात सापडल्या. या सर्वाचा परिणाम म्हणजे  गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीच नाही अशी स्थिती आहे. मात्र, आता शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

| प्रमोद नाना भानगिरे यांनी लावून धरला होता विषय

पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट 32 गावांच्या (Merged 32 villages) समस्या सोडवण्यासाठी “लोकप्रतिनिधी समिती” (Representative Committee) नियुक्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याचा कुठलाही अध्यादेश नव्हता. याकडे शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena City President Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे लक्ष वेधले होते. तसेच समाविष्ट गावांना न्याय देण्याची मागणी भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसारही समिती स्थापन करण्यात आली होती.—

: गाव आणि लोकप्रतिनिधी यादी

1. मांजरी बुद्रुक  – अमर राजू घुले 2. साडे सतरा नळी – उल्हास दत्तात्रय तुपे 3. केशवनगर मुंढवा – विकी शिवाजी माने 4. सुसगाव – बाळासाहेब रामदास चांदेरे 5. लोहगाव – सुनील बबन खांदवे 6. शिवणे गाव – सचिन विष्णू दांगट 7. धायरी गाव – अश्विनी किशोर पोकळे 8. बावधन – स्वाती अनंता टकळे 9. उंडरी – पीयुषा किरण दगडे 10. होळकरवाडी – राकेश मारुती झाम्बरे 11. आंबेगाव खुर्द – श्रीकांत मारुती लिपार्ने 12. पिसोळी – मछिंद्र काळुराम दगडे 13. वाघोली – संदीप सोमनाथ सातव 14. मांजरी बु – बाळासाहेब वसंत घुले 15. साडेसतरा नळी – भूषण माउली तुपे 16. केशवनगर – वंदना महादेव कोद्रे 17. उंड्री – राजेंद्र काशिनाथ भिंताडे 18. पिसोळी – स्नेहल गणपत दगडे

—नवीन तीन सदस्य

१. वाघोली – गणेश सातव२. मांजरी-मुंढवा – मयुर खुलसे३. उँड्री – वसंत कड

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0