Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

HomeपुणेBreaking News

Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

कारभारी वृत्तसेवा Oct 30, 2023 3:35 PM

Hemant Rasne : Standing Commitee : स्थायी समिती बैठकीतील महत्वाचे निर्णय जाणून घ्या
Nitin Gadkari Sabha in Kasba Pune | कसबा विधानसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन
Pankaja Munde | आम्ही प्रत्येक निवडणूक चुरशीची समजून लढवत असतो | पंकजा मुंडे

Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

| हेमंत रासने यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

 

Pune News पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील दाट वस्ती आणि गावठाण भागातील बांधकामाच्या सामायिक अंतरामध्ये (पुढील सामायिक अंतर वगळून) सवलत देऊन हार्डशिप आकारणी करावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन केली. (PMC Pune News)

 

रासने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, UDCPR नियमावलीमध्ये दाट लोकवस्ती भागातील मिळकतीसाठी 6.1.1 नियमावली आहे,सदर गावठा ण भागातील अनेक मिळकतीचे पुनर्विकसन अत्यंत आवश्यक आहे.तेथे भाडेकरूंचेही पुनर्वसानासोबत मिळकत धारकांचेही प्रश्न गंभीर आहेत.हा भाग नागरी सुविधांपासून वंचित आहेच तसेच अनेक ठिकाणी वास्तू धोकादायकही झालेल्या आहेत.५ जानेवारी २०१७ रोजीच्या वि.नि.नियमावली व विकास आराखड्यान्वये या भागात अनुज्ञेय FSI हि कमी झाला होता.प्रस्तावित रस्ता रुंदीही बऱ्याच ठिकाणी रद्द झाली आहे.

गावठाण भागामध्ये विकसनाचे काम करणेस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याची आपणास कल्पना आहेत. आजपावेतो,इमारतींना कोणतेही साईड मार्जिन न सोडता नकाशांना मंजुरी मिळत होती. परंतु वरील विनिमयान्वे १५ मि.उंचीच्या वरील इमारत असेल तर त्या इमारतीसाठी १ मी.साईड मार्जिनचे बंधन आहे.अनेक ठिकाणी इमारतींचे नकाशे कोणतेही साईड मार्जिन न सोडता मंजूर झाले आहे. In situ – FSI / TDR घेणेच्या वेळेस सदर १ मीटर साईड मार्जिनची अडचण झाली आहे.
या नियमांमध्ये बदल करणे संदर्भात शासनाकडे पत्र व्यवहार केला होता.त्यास अनुसरून म.न.पा.ने हि  २४/०९/२०२१ रोजी अभिप्राय दिलेला होता, ज्या अन्वये वरील १ मीटर साईड मार्जिनची आवश्यकता नसल्याचे कळविले होते. १५/०५/२०२३ रोजी शासनस्तरावरून एक आदेश या बाबत प्रसृत झाला आहे.त्यानुसार UDCPR 2.4 अन्वये स्पष्ट निदर्शक अडचण ( Demonstrable Hard Ship ) उदभवत असल्यास अशा ठिकाणी शिथिलता देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत असे स्पष्ट केलेले आहे.
आपलेकडून या सर्व बाबींचा विचार करून वरील संदर्भीय परिपत्रक पारित केले आहे. परंतू हि सवलत पुरेशी होत नाही, कारण या परिपत्रकान्वये सदरची सवलत फक्त १८ मी. खोलीपर्यंतच्या म्हणजेच ६० फुट खोली असणाऱ्या मिळकतीनांच लागू होते.

गावठाणामध्ये १०० फुट ते १५० फुट खोलींच्या जास्तीत जास्त ईमारती,वाडे आहेत. प्रचलित वि.नि. नियमावलीनुसार १५ मी.उंची वरील ईमारतींना Fire Act नुसार Provisional ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.तसेच भोगवटापत्रा पूर्वी सदर अग्निशमन विभागाकडून अंतिम ना हरकत दाखला घेणेचे बंधन आहे, ज्या योगे ईमारतींमध्ये कायद्यानुसार आवश्यक आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली जाते. या बाबींचा विचार करून वरील  परिपत्रकातील १८ मी.खोलीची अट शिथिल करावी व नवीन परिपत्रक पारित करावे.