Pune News | पुणे महापालिका स्वच्छतादूतांचा कृतज्ञता सन्मान ! | भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलोनीचा उपक्रम 

HomeBreaking News

Pune News | पुणे महापालिका स्वच्छतादूतांचा कृतज्ञता सन्मान ! | भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलोनीचा उपक्रम 

Ganesh Kumar Mule Sep 14, 2025 1:43 PM

Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागी मल्टीमोडल हब आणि एस.टी. स्टँण्ड उभारण्यासाठी अजित पवार यांनी केल्या सूचना 
Mula, Mutha and Indrayani rivers : Water hyacinth : मुळा, मुठा आणि इंद्रायणी नद्यांमधील जलपर्णी जैविक पद्धतीने हटविणार
MLA Siddharth Shirole  | प्रत्येक ठिकाणी जनतेचा मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद याच्या जोरावर निवडून येणारच | आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला विश्वास 

Pune News | पुणे महापालिका स्वच्छतादूतांचा कृतज्ञता सन्मान ! | भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलोनीचा उपक्रम

 

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – छत्रपती शिवाजीनगर, विधानसभा म. संघाचे  आमदार सिद्धार्थ  शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलोनी आयोजित सन्मान परिश्रम, समर्पण व जबाबदारीने काम करणाऱ्या, कर्तव्याप्रती निष्ठा असणाऱ्या स्वच्छतादूत कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा आरोग्य कोठी, छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथे पार पडला. प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू देऊन या स्वच्छतादूतांचा गौरव यावेळी करण्यात आला.

घोले रोड क्षेत्रीय कार्यालय सहा. आयुक्त तिमया जंगलेजी तसेच छत्रपती शिवाजीनगर दक्षिण मंडल अध्यक्ष शैलेश बडदे, मंडल सरचिटणीस अपर्णाताई कुऱ्हाडे, प्रभाग १२ चे अध्यक्ष सुजीत गोटेकर तसेच सहआयोजिका मनीषा दुधाणे, आरोग्य निरीक्षक राहुल शेळके, आरोग्य निरीक्षक उदय सणस, मुकादम राजेंद्र गायकवाड, अमित शिंदे, सुबोध उत्तेकर , ऋषिकेश इंगळे, कृष्णा बताने आदी मान्यवर व सहकारी उपस्थित होते.

समाजातील प्रत्येक घटकाचे आपण देणे लागतो. स्वच्छता कर्मचारी देखील त्यातील एक महत्वपूर्ण घटक आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचे गेली अनेक दिवस मनामध्ये होते. त्यातूनच हा कृतज्ञता सन्मान करण्याचं ठरवलं. समाजातील शेवटच्या घटकाच्या सेवेसाठी अविरत कार्य करण्याची अंत्योदयाची संकल्पना प्रामाणिकपणे राबविण्याचा हा एक प्रयत्न आहे, असे अजय दुधाने यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0