Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला
| कॉंग्रेस नेत्यांचा आरोप
Pune News | निवडणुकीत भाजपाने (BJP) आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा (Old Wada) विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू. परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला आहे. असा आरोप कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar), कॉंग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी केला. (Pune News)
कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहराचा विकास आराखडा (Pune Devlopment Plan) सन 2013-14 मध्ये प्रकाशित झाला. त्या वेळेस शहरातला गावठाण भाग विशेषता पेठामध्ये बांधकामाला 1.5 FSI करण्यात आला होता. या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता व सभागृहात तसेच राज्य सरकारने हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यावेळेस पुण्यातील पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांवर अन्यायकारक आहे अशी हरकत व सूचना केली होती. पुण्यातील गावठाणात आलेले जुने वाडे व त्यात राहणारे नागरिक अक्षरश 60 ते70 स्क फूट घरात राहत आहेत, भाडेकरूंना पुनर्वसन करण्यासाठी व वाड्यांच्या विकास करायचा असेल तर 2.50 FSI द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. (Pune Municipal Corporation)
सन 2015 मध्ये भाजप सरकारने मनपा कडून विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेतला व तो प्रकाशित केला. परंतु त्यात सुद्धा पुणेकरांना गावठाण भागात 1.50 FSI. ठेवण्यात आला होता. त्यावर निवडणुकीत भाजपाने आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू.परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठाया मध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (PMC Pune)
तसेच वाड्याचा व पेठामधील घरांचा विकासाला 1 मीटर साईड मार्जिन सोडावी लागणार असे समान विकास नियमावलीत (U.D.C.P.R) सन 2020 मध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत आपण 1 मीटरची अट रद्द करू असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी अनेक वेळा दिली व कसबा पोटनिवडणुकीत सुद्धा दिले होते परंतु साईड मार्जिनची अट सुद्धा तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याचा विकास ठप्प होणार आहे. पुणेकरांनी भाजपा ला 100 नगरसेवक 4आमदार 1खासदार दिले. त्या बदल्यात पुणेकरांवर भाजपाने सूड उगवला आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (Pune News)
News Title | Pune News | It is difficult to develop palaces in Pune BJP took revenge on the people of Pune| Allegation of Congress leaders