Pune News | पर्वती परिसरातील अनधिकृत थडगा प्रकरणाची चौकशी करण्याची धीरज घाटे यांची मागणी

HomeपुणेBreaking News

Pune News | पर्वती परिसरातील अनधिकृत थडगा प्रकरणाची चौकशी करण्याची धीरज घाटे यांची मागणी

Ganesh Kumar Mule Jun 06, 2023 8:10 AM

PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 
PMC Pune Assistant Health Officer | राजेश दिघे यांना सहायक आरोग्य अधिकारी पदी  पदोन्नती
Supriya Sule | प्रगती किंवा डेक्कन एक्स्प्रेस बारामतीहून सोडावी; प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल

Pune News | पर्वती परिसरातील अनधिकृत थडगा प्रकरणाची चौकशी करण्याची धीरज घाटे यांची मागणी

Pune News | पर्वती परिसरातील (Parvati pune)  एका अनधिकृत थडग्याचा (मजार) (Unauthorised grave) विषय सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात सोमवारी दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक पायगुडे यांना निवेदन दिले आणि त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तातडीने पोलिस चौकशी करण्याची मागणी केली. अशी माहिती भाजप नेते आणि माजी सभागृह नेते धीरज घाटे (Dheeraj Ghare) यांनी दिली. (Pune News)
घाटे यांनी सांगितले कि, या संपूर्ण प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच या ठिकाणी अनधिकृतपणे काही घडू नये, यासाठी पोलिसांनी या विषयांत लक्ष घातले पाहिजे आणि योग्य कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.  याच विषयासंदर्भात मंगळवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही निवेदन देण्यात येणार असून, त्यांनाही या विषयात लक्ष घालण्याची मागणी करण्यात येणार आहे.  नागरिकांनी या संदर्भात सध्या शांत राहून पोलिसांना आपला तपास करू द्यावा, अशी सर्वांना विनंती आहे. असे घाटे यांनी सांगितले. सध्याच्या वातावरणात हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने हे पत्र आपणास देत आहे. सध्या या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सुशोभीकरणामुळे पुढे तिथे नमाज पठण वगैरे सुरू होऊ नये, यासाठी आपण तातडीने या विषयात लक्ष घालून संबंधित ठिकाणी उचित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करतो आहे. असेही घाटे म्हणाले.
—-
News title | Pune News |  Dheeraj Ghate’s demand to investigate the case of unauthorized graves in Parbati area