Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed Limit | कात्रज बोगदा ते नवले पूल गाडी चालवताना आता वेगमर्यादेचे बंधन | अन्यथा 2 हजाराचा दंड 

HomeBreaking Newsपुणे

Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed Limit | कात्रज बोगदा ते नवले पूल गाडी चालवताना आता वेगमर्यादेचे बंधन | अन्यथा 2 हजाराचा दंड 

Ganesh Kumar Mule May 19, 2023 2:48 PM

Chandani Chauk | ओव्हरपास तोडताना काही नुकसान, असुविधा झाल्यास NHAI जबाबदार राहणार नाही चांदणी चौक फ्लायओव्हर कामाच्या संदर्भात NHAI चे जाहीर आवाहन
Kasba by-election | विजयाबद्दल काँग्रेस नेत्यांचे काय आहे विश्लेषण!
Transfer | PMC | आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या! | प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश

Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed Limit | कात्रज बोगदा ते नवले पूल गाडी चालवताना आता वेगमर्यादेचे बंधन | अन्यथा 2 हजाराचा दंड

Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed Limit | कात्रज बोगदा (Katraj Tunnel) ते नवले पुल (Navale Bridge) स्पीड लिमिट (speed limit) ४० किलोमीटर प्रति तास करण्यात आली आहे. नियम मोडला तर कॅमेरात कैद होणार आणि त्यासाठी २००० रुपये दंड (Rs 2000 fine) ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळे  वाहन सावकाश चालवा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून (Traffic Police pune) करण्यात आले आहे. ( Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed Limit)

बंगळूरू महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान अवजड वाहनांना 40 कि.मी. वेग मर्यादा घालून देण्यात आली आहे. कात्रज बोगदा व नवले पुलादरम्यान सातत्याने होत असलेल्या अपघांतामुळे पुणे वाहूतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या वेगाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी हा नियम अमंलात आणण्यात आला आहे. (Pune navale bridge speed limit)

कात्रज बोगदा ते नवले पूल या परिसरात होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण अणण्यासाठी परिसरात पाहणी करण्यात आली. कात्रज बोगदा ते नवले पूल या भागात सर्वाधिक अपघात हे अवजड वाहनांमुळे झाल्याचे निदर्शनास अले. या घाटातून वेगात येणारी वाहने तसेच त्यांची ब्रेक स्स्टीम ही अनेकदा फेल होत असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे या वहानांचा वेग कमी करणे गरजेचे आहे. यासाठी ही वेग मर्यादा 40 कि.मी. प्रतीतास एवढी करावी, असा निर्णय समितीच्या चर्चेतमध्ये घेण्यात आला. या अवजड वाहनांमध्ये ट्रॅक्‍टर-ट्रेलर, अर्टीक्‍युलेटेड व्हेइकल्स, ट्रक-ट्रेलर, मल्टी ऍक्‍सल, कंटेनर अशा मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा समावेश आहे. यामध्ये अत्यावश्‍यक रुग्णवाहिका, पोलिसांचे वाहन किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना सूट असणार आहे. (navale bridge news pune)

कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान अपघात रोखण्यास उपाय योजना राबविल्या जात आहेत. यापैकी एक वेग मर्यादेची अंमलबजावणी केली जात आहे. याशिवाय नागरिकांना काही सूचना करावयाच्या असल्यास 26 मे पर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला नं.6, जेलरोड, येरवडा, पुणे येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्‍त यांनी केले आहे.



News Title | Pune Navale Bridge to Katraj Tunnel Speed ​​Limit | Speed ​​limit now imposed while driving from Katraj Bogda to Navale Bridge Otherwise a fine of 2 thousand