पुणे महापालिका १४ शिक्षकांना देणार आदर्श शिक्षक पुरस्कार
महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुणे महानगरपालिका कार्यकक्षेतील मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या एकूण १४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १४ पैकी १० शिक्षक पुणे मनपा शाळेतील तर ४ शिक्षक खाजगी प्राथमिक शाळेतील आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ५९ प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे आले होते. सदर प्रस्तावातून गुणवंत शिक्षक निवडण्यासाठी शिक्षण देतील तज्ञ व्यक्तीची समिती नेमण्यात आली होती. शासन निकषा प्रमाणे आलेल्या प्रस्तावामभून आदर्श शिक्षक निवडण्यात आले.आदर्श शिक्षक पुरस्कार्थी शिक्षकांना मानपत्र, सन्मानचिन्ह तसेच टॅब देवूनगौरविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (प्राथमिक) डॉ. मीनाक्षी राऊत आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी दिली आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची यादी.
मनपा प्राथमिक शाळा –
अंकुश शिवाजी माने (कात्रज), ज्ञानेश वसंतराव हंबीर (खराडी), नवनाथ बाळासाहेब भोसले (खराडी), रजनी गोविंद गोडसे(वडगाव शेरी), हेमलता भिमराव चव्हाण (कात्रज), विजय दिगंबर माने (हडपसर), राणी जयंत कुलकर्णी (कात्रज) चित्रा नितीन पेंढारकर (वारजे), स्मिता अशोक धारूरकर (हिंगणे खुर्द), वर्षा अनंतकुमार पंचभाई ( ढोले पाटील रोड)
खासगी शाळा शिक्षकाचे नाव
पुष्पा महेंद्र देशमाने (नवीन मराठी शाळा)रोहिणी गणेश हेमाडे (कै. चंद्रकांत दांगट पाटील प्राथमिक विद्यालय, वडगाव बु॥)डॉ. प्रीती दिवाकर मानेकर (हिंद इंग्लिश मिडीयम स्कूल, विमाननगर), शुभदा दीपक शिरोडे (म.ए.सो. भावे प्राथमिक शाळा)