Pune Municipal Corporation | स्मार्ट पुणे महापालिका भवनात कर्मचाऱ्यांसाठी कँटीन कधी होणार?

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation | स्मार्ट पुणे महापालिका भवनात कर्मचाऱ्यांसाठी कँटीन कधी होणार?

Ganesh Kumar Mule Jul 01, 2023 7:15 AM

Chief Auditor objection | ‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’ | टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश | विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत
21 black spots frequent accidents in Pune city
Open Gym | ओपन जिममध्ये विजेचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करा | मनविसे ची महापालिका आयुक्ताकडे मागणी

Pune Municipal Corporation | स्मार्ट पुणे महापालिका भवनात कर्मचाऱ्यांसाठी कँटीन कधी होणार?

Pune Municipal Corporation | (Author- Ganesh Mule) | पुणे महापालिका (PMC Pune) ही राज्यातील अ वर्गातील महापालिका आहे. ई गव्हर्नन्स बाबत पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) राज्यात आघाडी घेतली असून विविध पुरस्कार देखील मिळवले आहेत. अशा स्मार्ट महापालिका भवनात (PMC Building) मात्र कँटीन (PMC Canteen) ची वानवा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना मात्र गैरसोयीला सामोरे जावे लागते. कँटीन कधी हो होणार, असा प्रश्न कर्मचारी वर्गातून विचारला जात आहे. (Pune Municipal Corporation)

दुपारच्या जेवणासाठी पार्किंग मध्ये शोधावी लागते जागा!

पुणे शहर आणि पुणे महापालिका (Pune Corporation) ही राज्यातच नाही तर देशात महत्वाची समजली जाते. महापालिकेच्या स्मार्ट कारभाराबद्दल राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील कौतुक केले जाते. असे असले तरी पुणे महापालिका प्रशासन (Pune Civic Body) आपल्या कर्मचाऱ्यांच्या सोयींबाबत मात्र उदासीन दिसून येते.महापालिका भवन किंवा कुठल्याही क्षेत्रीय कार्यालयात (PMC Ward Offices) कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेचे कँटीन नाही. कर्मचाऱ्यांना याची सर्वात जास्त निकड दुपारच्या जेवणाच्या वेळी भासते. कारण दुपारी जेवायला बसताना कर्मचाऱ्यांना जागा शोधाव्या लागतात. काही कर्मचारी आपल्या कार्यालयात बसण्याच्या जागेवर, काही कर्मचारी पायऱ्यांवर तर काही कर्मचारी पार्किंग मध्ये जेवणासाठी बसलेले असतात. जास्त गैरसोय पावसाळ्यात होते. कारण पावसाळ्यात पायऱ्यांवर किंवा पार्किंग मध्ये बसता येत नाही. तिथे पाणी साचलेले असते. जवळ घर असणारे कर्मचारी आणि अधिकारी (PMC Employees and Officers) जेवणासाठी आपल्या घरी निघून जातात. घरी गेल्याने मात्र कर्मचाऱ्यांचा बराच वेळ खर्ची होतो. यात महापालिकेच्या कामकाजाचेच नुकसान आहे. (PMC Pune News)
सायंकाळच्या वेळी चहा, कॉफी घेण्यासाठी बरेचसे कर्मचारी महापालिका भवना बाहेर जाताना दिसतात. यात देखील त्यांचा बराच वेळ वाया जातो. काही दिवसांपूर्वी जुन्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर आरोग्य विभागाच्या शेजारी कँटीन सुरु करण्यात आले होते. मात्र ते चहा, कॉफी आणि स्नॅक पुरतेच मर्यादित होते. तिथे बसण्याची सोय नव्हती. मात्र त्यामुळे कर्मचारी चहा घेण्यासाठी भवन सोडून जात नव्हते. त्यात वेळ वाचायचा. मात्र ते ही कॅन्टीन बंद झाले. नवीन इमारतीत कॅन्टीन साठी जागा देखील ठरवून देण्यात आली होती. मात्र त्याबाबत उदासीनताच दिसून येत आहे. (Pune Municipal Corporation News)
अ दर्जाच्या संस्थेत कमर्चाऱ्यांना कॅन्टीन नसणे, हे पुणे महापालिकेसाठी शोभणारे नक्कीच नाही. इतर संस्थांमध्ये असे कॅन्टीन निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने देखील याबाबत गंभीरपणे पाऊले उचलून कॅन्टीन तयार करावे, अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.
News Title | Pune Municipal Corporation |  When will there be a canteen for employees in Smart Pune Mahapalika Bhawan?