Pune Municipal Corporation | महापलिकेत सरळसेवेने भरती करण्यासाठी कर्मचारी निवड समिती गठीत!

Homeadministrative

Pune Municipal Corporation | महापलिकेत सरळसेवेने भरती करण्यासाठी कर्मचारी निवड समिती गठीत!

Ganesh Kumar Mule Mar 16, 2026 7:33 PM

PMC encroachment action | महापालिकेकडून आंबेगाव बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरूच 
Ashish Shelar on Pune Ganeshotsav | गणेशोत्सवात ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंचा वापर आदी विषयावर गणेश मंडळांनी देखावे सादर करावेत | सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
PMC Encroachment Action | मेट्रो च्या जागेतील ५० अनधिकृत झोपड्या हटवल्या | महापालिका आणि मेट्रो प्रशासनाची कारवाई!

Pune Municipal Corporation | महापलिकेत सरळसेवेने भरती करण्यासाठी कर्मचारी निवड समिती गठीत!

 

 

Pune PMC News – (The Karbhar News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आस्थापने वरील वर्ग-१ ते वर्ग-३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यसाठी  कर्मचारी निवड समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष हे अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) असणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जारी केले आहेत. (Pune PMC Bharti)

पुणे महानगरपालिका (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील मकर्मचारी निवड समिती संदर्भात असलेल्या नियमास अनुसरून पुणे महानगरपालिका आस्थापनेवर वर्ग-१ ते वर्ग-३ मधील विविध पदांच्या सरळसेवेने भरती प्रक्रियेसाठी कर्मचारी निवड समिती म गठीत करण्यात आली आहे.

 कर्मचारी निवड समिती अध्यक्ष व सदस्य नावे

अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) – अध्यक्ष

मुख्य लेखापरीक्षक, पुणे महानगरपालिका – सदस्य

अविनाश सकपाळ, उप आयुक्त, मागासवर्ग प्रतिनिधी – सदस्य

नलिनी सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त, अल्पसंख्यांक प्रतिनिधी,  – सदस्य

जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, पुणे – सदस्य

जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पुणे – सदस्य

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुणे – सदस्य

उप आयुक्त (सामान्य प्रशासन), पुणे महानगरपालिका – सदस्य सचिव

संबंधित खातेप्रमुख – सदस्य

खातेप्रमुखांमध्ये अपरिहार्य कारणास्तव बदल झाल्यास संबंधित पदभार धारण करणाऱ्या अधिकारी यांनी कामकाज करावयाचे आहे. तसेच या समितीतील जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व अल्पसंख्यांक प्रतिनिधी यांना पत्र पाठवून समितीच्या कामासाठी आमंत्रित करण्यात यावे. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: