Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | बहिस्थ पद्धतीने पदवी/पदविका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून रहावे लागणार वंचित!

Homeadministrative

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | बहिस्थ पद्धतीने पदवी/पदविका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून रहावे लागणार वंचित!

Ganesh Kumar Mule Jun 11, 2025 10:01 PM

PMC Gunvant Kamgar Purskar | गुणवंत कामगार पुरस्कारासाठी महापालिका कर्मचारी उदासीन का? | अर्ज करण्यासाठी अजून एकदा मुदतवाढ
PMC Labour Welfare Fund | कामगार कल्याण निधीचे सदस्य म्हणून काम करण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन 
AI Training in PMC | पुणे महानगरपालिकेत Ai प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदोन्नती | बहिस्थ पद्धतीने पदवी/पदविका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पासून रहावे लागणार वंचित!

| महापालिका प्रशासन आता पदोन्नती ची नवीन प्रक्रिया राबवणार | अतिरिक्त आयुक्त यांचा निर्णय

 

Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (Civil) Promotion – (The Karbhari News Service) –  पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC)) आस्थापनेवरील कार्यरत वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांमधून (Class 3 and 4) अभियांत्रिकी संवर्गात (Engineering Cadre) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (Junior Engineer (Civil)) या पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमानुसार महापालिका प्रशासनाने 28 जानेवारीला परीक्षा (Exam) घेण्याची तयारी केली होती. मात्र याविरोधात उमेदवारांनी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. उच्च नायालयाने महापालिकेला आदेश केले होते कि याबाबतच्या अडचणी टाळण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात (Deferr)  यावी. तरीही प्रशासन परीक्षा घेण्यावर ठाम होते. मात्र महापालिका आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. दरम्यान आता महापालिका प्रशासनाकडून ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. प्रशासन आता नवीन प्रक्रिया राबवणार आहे. तसेच बहिस्थ पद्धतीने (Distance Education) अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. पूर्णवेळ पदविका किंवा पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. तसेच परीक्षा घेतली जाणार आहे. या बाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रेन (M J Pradip Chandren IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC) Junior Engineer (civil) promotion)

पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता (Executive Engineer) , उप अभियंता (Deputy Engineer) तसेच कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) या पदांच्या नेमणुकीची पद्धत, टक्केवारी आणि अर्हता बदलण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. याला  राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता कनिष्ठ अभियंता यांना 25% च्या ऐवजी 15% पदोन्नती ठेवण्यात आली आहे. त्या पदोन्नती साठी आता कर्मचाऱ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. तर 75% च्या ऐवजी 85% सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

त्यानुसार महापालिका प्रशासनाने परीक्षा घेण्याची तयारी केली होती. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देण्यासाठी 5 वर्षाचा अनुभव आणि स्थापत्य ची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. त्यानुसार 28 जानेवारी 2024 ला ही परीक्षा घेतली जाणार होती.

दरम्यान काही उमेदवारांनी पाहिल्यापासूनच अशी परीक्षा घेण्याला विरोध होता. त्यानुसार या उमेदवारांनी महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने या उमेदवारांना दिलासा दिला होता. न्यायालयाने म्हटले होते कि याचिका दाखल करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा देऊन ते त्यात नापास झाले तरी प्रशासनाला या उमेदवारांना पदोन्नती साठी अपात्र करण्याचा अधिकार नाही. हा उमेदवारांना दिलासा मानला जात होता. तसेच याबाबतच्या अडचणी टाळण्यासाठी महापालिकेने परीक्षा पुढे ढकलावी, असे कोर्टाने म्हटले होते. मात्र महापालिका प्रशासन मात्र परीक्षा घेण्यावर ठाम होते. आम्ही ऐनवेळेला परीक्षा रद्द करणार नाही. असे प्रशासनाने म्हटले होते.

मात्र महापालिका प्रशासनाने पुन्हा आपला निर्णय बदलला होता. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्यावर महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परीक्षेची नवीन तारीख ही कोर्टाचा अंतिम निर्णय काय असेल, यावरून निश्चित केली जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होता. यामुळे उमेदवारांना   दिलासा मिळाला होता.

मात्र आता प्रशासनाने ही पूर्ण प्रक्रिया रद्द केली आहे. प्रशासन आता नवीन प्रक्रिया राबवणार आहे. तसेच बहिस्थ पद्धतीने अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. पूर्णवेळ पदविका किंवा पदवी आणि ५ वर्षाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. तसेच परीक्षा घेतली जाणार आहे. या बाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रेन यांनी जारी केले आहेत.